देशात धान्याचे विक्रमी उत्पादन

केंद्रीय कृषी मंत्रालयाचा २०२१-२२ चा चौथा अंदाज जाहीर
rice and wheat
rice and wheatAgrowon

पुणे ः देशात यंदा धान्याचे उत्पादन (Food grain production) जवळपास ५० लाख टनांनी वाढले. २०२०-२१ च्या हंगामात ३ हजार १०७ लाख टन धान्य उत्पादन हाती आले होते. तर २०२१-२२ च्या हंगामात देशात ३ हजार १५७ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. तर मागील पाच वर्षांतील सरासरीपेक्षा या हंगामात २५० लाख टनांनी उत्पादन अधिक राहिले, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने (agriculture department) स्पष्ट केले.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी (ता.१७) देशातील २०२१-२२ च्या हंगामातील विविध पीक उत्पादनाचा चौथा सुधारित अंदाज (fourth estimate) जाहीर केला. या हंगामात भात (paddy), मका (maize), हरभरा (chana), कडधान्य (pulses), मोहरी (mustard), तेलबिया (oilseeds) आणि उसाचे (sugarcane) उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

rice and wheat
Dalimb Market : डाळिंबाचा मृग बहर ५० टक्क्यांनी घटला | ॲग्रोवन

चौथ्या सुधारित अंदाजानुसार यंदा तांदळाचे उत्पादन १ हजार ३०२ लाख टनांवर पोहोचले. २०२०-२१ च्या हंगामात १ हजार ९५ लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते. तर तांदळाचे उत्पादन मागील पाच वर्षांतील सरासरीपेक्षा १३८ लाख टनांनी अधिक आहे. तर गव्हाचे उत्पादन मात्र १ हजार ९५ लाख टनांवरून १ हजार ६८ लाख टनांपर्यंत कमी झाले. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात १२२ वर्षांतील उच्चांकी तापमान होते. त्याचा फटका गहू उत्पादनाला बसला. त्यामुळे यंदा गहू उत्पादनात २७ लाख टनांची घट झाली, असे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र मागील पाच वर्षांतील सरासरीपेक्षा गव्हाचे उत्पादन २९ लाख टनांनी अधिक झाले.

भरडधान्याचे उत्पादन ५०९ लाख टनांवर पोहोचले. आधीच्या हंगामात ५१३ लाख टन भरडधान्याचे उत्पादन झाले होते. तर मका उत्पादन मात्र वाढले. मका उत्पादन ३१६ लाख टनांवरून ३३६ लाख टनांवर पोचले. तर कडधान्याचे उत्पादनही २२ लाख टनांनी वाढल. २०२१-२२ मध्ये २७६ लाख टन कडधान्य उत्पादन झाले, जे आधीच्या हंगामात २५४ लाख टनांवर स्थिरावले होते. कडधान्यामध्ये तुरीचे उत्पादन ४३.४ लाख टन आणि हरभरा १३७.५ लाख टन झाला. तूर आणि हरभरा दोन्ही कडधान्यांचे उत्पादन या हंगामात वाढले. कडधान्य उत्पादन मागील पाच वर्षांतील सरासरीपेक्षा जवळपास ३९ लाख टनांनी जास्त आहे.

rice and wheat
आंबा उत्पादकासाठी Mango Growers फळमाशी ठरली त्रासदायक| ॲग्रोवन

तेलबियांचे ३७६ लाख टन उत्पादन झाले. आधीच्या हंगामातील तेलबिया उत्पादन ३५९ लाख टनांवर स्थिरावले होते. तेलबियांमध्ये भुईमुगाचे उत्पादन १०१ लाख टन, सोयाबीन १२९.९ लाख टन, तर मोहरीचे उत्पादन ११७ लाख टन झाले. या हंगामात भुईमुगाचे उत्पादन काहीसे घटले, तर सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनात वाढ झाली.

देशात २०२१-२२ च्या हंगामात उसाचे उत्पादनही घटले. आधीच्या हंगामात देशात ४ हजार ५३ टन ऊस झाला होता. तर या हंगामात ४ हजार ३१८ लाख टन ऊस मिळाला. तर कापसाचे उत्पादन मात्र ४० लाख गाठींनी कमी राहिले. एक कापूस गाठ १७० किलोंची असते. या हंगामात ३१२ लाख गाठी कापूस मिळाला. तर आधीच्या हंगामात ३५२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते.

यंदा भात लागवडीची चिंता
देशात यंदा भात लागवड गेल्या वर्षीपेक्षा पिछाडीवर आहे. त्यामुळे यंदा खरिपातील धान्य उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. ताज्या आकडेवारीनुसार भाताची लागवड १३ टक्क्यांनी कमी आहे. पावसाला उशीर झाल्याने भात लागवड घटल्याचे जाणकारांनी सांगितले. जुलै महिन्याच्या शेवटी देशात २३१ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. तर याच काळात मागील खरिपातील भात लागवड २६८ लाख हेक्टरवर झाली होती. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हरियाना राज्यात भाताची लागवड कमी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com