Dr. Neelam Gorhe : भोर, मुळशीतील तीन गावांत पुनर्वसन करावे

भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली, मुळशी तालुक्यांतील घुटके तसेच अन्य काही गावांमध्ये पावसाळ्यात होत असलेल्या भूस्खलनामुळे जीवित व आर्थिकहानी असल्याने राज्य सरकारने तत्काळ पाहणी करून या गावांचे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करावे.
Rural Maharashtra
Rural MaharashtraAgrowon

Pune News : भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली, मुळशी तालुक्यांतील घुटके तसेच अन्य काही गावांमध्ये पावसाळ्यात होत असलेल्या भूस्खलनामुळे जीवित व आर्थिकहानी असल्याने राज्य सरकारने तत्काळ पाहणी करून या गावांचे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करावे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिल्याचेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. भूस्खलन होणाऱ्या गावांना तत्काळ मदत करण्यासाठी शासनाने टास्क फोर्स तयार करावे. ज्या गावांना भूस्खलन व अतिवृष्टीची भीती आहे, अशा गावांतील शाळांच्या मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

Rural Maharashtra
Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या रोखण्याबाबत नीलम गोऱ्हेंचे मुख्य सचिवांना पत्र

दरम्यान, भोर-महाड रस्त्यावर ४५ घरांचे ३५६ लोकसंख्या असलेले कोंढरी गावातील डोंगरात २०१९ मध्ये भूस्खलन झाले होते. त्या वेळी भेट दिली असता, तेथील परिस्थिती अत्यंत वाईट होती. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.

...तरीही कार्यवाही झाली नाही

भोर महसूल प्रशासनाने कोंढरी येथील खासगी गायरान जागेत ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिर, क्रीडांगण, दवाखाना, बाग, रस्त्यासाठी जागा या सर्व कामांसाठी सुमारे १३ कोटी ८ लाख आणि जागेसाठी ४८ लाख ७५ हजार असा एकूण १३ कोटी ५७ लाख खर्चाचा प्रस्ताव तयार केला.

तत्कालीन पालकमंत्री यांनी याबाबत २०२१ मध्ये बैठक घेऊन निर्देश दिले. मात्र तरीही याबाबत कार्यवाही झाली नाही, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com