Nira Vikri : निरा विक्रीच्या जाचक अटी हटवा

Tadi Update : ताडीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या विक्रमगडमधील आंबेघर गावात सप्टेंबर ते जुलै या कालावधीमध्ये ताडीच्या झाडांपासून निघणारा नैसर्गिक रस अर्थात ताडी विक्री व्यवसाय केला जातो.
Healthy Neera
Healthy NeeraAgrowon

Tadi Update Palghar News : ताडीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या विक्रमगडमधील आंबेघर गावात सप्टेंबर ते जुलै या कालावधीमध्ये ताडीच्या झाडांपासून निघणारा नैसर्गिक रस अर्थात ताडी विक्री व्यवसाय केला जातो. यातून खेड्या-पाड्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो.

मात्र सरकारकडून जाचक नियम लागू करण्यात आले आहेत. या व्यवसायासाठी असलेले नियम, अटी शिथिल करावेत, अशी तरुणांकडून मागणी होत आहे.

सध्या उन्हाळ्याचा मोसमामध्ये ताडीचा उतारा कमी येत असल्याने रोज एका ताडाच्या झाडापासून जवळजवळ चार ते पाच लिटर ताडी मिळते. एक लिटरकरिता ३० रुपयांचा भाव आहे. उन्हाळ्यात ताडी शरीरासाठी थंडावा देणारी आहे आणि गुणकारी आहे.

त्यामुळे या हंगामात ताडी कमी निघत असली तरी मागणी जास्त आहे. सरकारने काही तालुक्यात ताडी व्यवसाय करण्याकरिता काही प्रमाणात राखीव परवाने ठेवले आहेत.

Healthy Neera
Neera Production : आरोग्यदायी नीरा निर्मिती तंत्रज्ञान

त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील तरुणांना नवीन टीडीआरप्रमाणे ताडी विक्री परवाना देण्याचे धोरण उत्पादन शुल्क खाते आणि महाराष्ट्र सरकारने ठरवले तर काहींना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील बेकारी दूर होण्यास मदतच होणार असल्याचे जाणकरांचे

म्हणणे आहे. आंबेघर व त्या अंतर्गत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर ताडी विक्री होते. या व्यवसायातून सरकारला महसूल मिळतो. या व्यवसायाचा नवीन परवाना ग्रामीण भागात देण्यासाठी जाचक अटी हटवून विक्री परवाना द्यावा, अशी मागणी आहे.

सरकारने ताडी विक्री व्यवसायाकरिता ठेवलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. सर्व ताडी विक्रेत्यांना कायदेशीररीत्या परवाने द्यावेत, याकरिता असलेले शुक्क भरण्यास तयार आहोत. सरकारने हा निर्णय घेतल्यास महसूल मिळेल आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. या व्यवसायावर अनेकांचे पोट भरले जाते.
रावजी तुंबडा, आंबेघर गाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com