Ground Water : भूजल साठा वाढविण्यासाठी संशोधन महत्त्वाचं

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन ‘मिशन भागीरथ प्रयास’ यशस्वी होईल.
Water Stock
Water StockAgrowon

Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेमार्फत (Nashik ZP) सुरू करण्यात आलेला ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रम स्तुत्य असून शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा (Ground Water Stock) वाढविण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात, भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यााठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जलतज्‍ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांनी केले.

नाशिक जिल्हा परिषदेतर्फे अयोजित ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रम कार्यशाळेत राजेंद्र सिंह बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते.

Water Stock
Water Bunds : वनराई बंधारेनिर्मितीत नाशिक विभाग राज्यात प्रथम

राजेंद्र सिंह म्हणाले, की महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन ‘मिशन भागीरथ प्रयास’ यशस्वी होईल.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की ‘मिशन भगीरथ प्रयास’मधून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच ‘मनरेगा’च्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होणार असून दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘मिशन भगीरथ प्रयास’अंतर्गत साधारण २०० गावांतून ७०५ कामांचे नियोजन करण्यात आले असून या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे.

‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी सादरीकरण केले.

Water Stock
Water Tanker : नाशिक जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी १५० गावांत ६०० बंधारे

उल्लेखनीय कामासाठी १० लाखांचा अतिरिक्त निधी

जिल्हा परिषदेचा ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील, असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा.

या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच १० लाखांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com