Agricultural Festival : सगरोळीत कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांची गर्दी

सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे तीनदिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.
 Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

Nanded Agricultural festival News : सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे तीनदिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.

या वेळी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रविशंकर चलवदे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी दिलीप दमय्यावार, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख उपस्थित होते.

दिलीप दमय्यावार यांनी, महिला बचत गट व शेतकरी गटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी. नाबार्डच्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.

रविशंकर चलवदे यांनी, शेतकऱ्यांनी स्वतः बीजोत्पादन करावे, त्यामुळे बियाण्यांचा मोठा खर्च टळेल. गोडाऊन, क्लिनिंग व ग्रेडिंग सेंटर, प्रक्रिया उद्योग उभे करावेत.

 Agricultural Festival
Agricultural Festival : तीन वर्षांनंतर जिल्ह्यात होणार कृषी महोत्सव

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजनेअंतर्गत शेतीपूरक उद्योगांना कर्ज भेटत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेती अवजारांसाठी व इतर साहित्यासाठी अनुदान उपलब्ध आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषी समृद्धी योजनेचा फायदा घ्यावा.

शेतकऱ्यांनी गट, कंपन्या तयार करावेत. प्रक्रिया उद्योग उभे करावेत. शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

डॉ. देवराव देवसरकर यांनी तीनदिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांनी येथील विविध प्रक्षेत्रावरील पिकांचा अभ्यास करावा, माहिती घ्यावी व त्याचा आपल्या शेतीमध्ये अवलंब करावा. जमिनीच्या प्रकारावरून पीक व त्याच्या वाणाची निवड करावी, असे सांगितले.

प्रमोद देशमुख यांनी, शेतकऱ्यांनी तृण धान्य पिकवावे व सुदृढ समाज निर्माण करण्यास मदत करावी असे आवाहन केले. या वेळी जवळपास तीन हजार शेतकऱ्यांची उपस्थिती होती. येथे पन्नासहून अधिक स्टॉल उभारले असून, शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com