Women's Self-Help Group In Hingoli : महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या कयाधू प्रदर्शनास प्रतिसाद

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कयाधू जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये एकूण ६२ प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.
Women Self- Help Group
Women Self- Help GroupAgrowon

Hingoli News : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (District Rural Development System) हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कयाधू प्रदर्शनामध्ये महिलांच्या उत्पादनाच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कयाधू जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये एकूण ६२ प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.

Women Self- Help Group
Rural Development In Roha : रोह्याच्या विकासाला गती

यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, हळद, मसाले, मठ्ठा, गावरान मेवा, दही धपाटे, शीतपेय, कटलेरी व्यवसाय, कापड व्यवसाय, विविध प्रकारच्या डाळी, मशरूम व गटांनी स्वतः तयार केलेले सौंदर्य क्रीम यासारख्या सर्व वस्तू पदार्थ हे स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत.

सुमारे एक लाख ६२ हजार १८० रुपयांची उलाढाल झालेली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती रूपाली गोरेगावकर, माजी जि. प. सदस्य विठ्ठल चौतमाल, विलास गोरे, प्रल्हाद मुळे, आदर्श कॉलेजचे डॉ. राजाराम पिंपळपल्ले, भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक पी. जी. माडेवार यांनी भेट देऊन सर्व स्टॉलधारक ग्रामीण महिलांचे कौतुक केले. त्यांच्याकडून वस्तू, पदार्थ सुद्धा खरेदी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com