Success Story : समर्थपणे सांभाळली शेतीसह ग्रामविकासाची जबाबदारी

लग्नानंतर सासरी म्हणजेच हिंगणे बुद्रुक येथे पती अनिल यांच्या साथीने शेतीला नवी दिशा दिली. मेहनत अंगवळणी असल्याने अवघड स्थितीतही पदर खोचून त्या उभ्या राहिल्या.
Aadarsh Sarpanch
Aadarsh SarpanchAgrowon

Jalgaon Development News : हिंगणे बुद्रुक (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील शारदा अनिल चौधरी यांनी आपले कुटुंब आणि शेतीची जबाबदारी सांभाळत सरपंच म्हणूनही सलग दहा वर्षे काम केले. या काळा त्यांनी महिला व ग्रामविकासाचे विविध उपक्रमही त्यांनी राबविले.

अकुलखेडा (ता. चोपडा, जि. जळगाव) गावच्या माहेरवाशीण असलेल्या शारदाताईंचे जीवन संघर्षमय होते. वडिलांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने इतरांच्या शेतात त्यांनी मजुरी केली. अशा परिस्थितीतही नववीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

लग्नानंतर सासरी म्हणजेच हिंगणे बुद्रुक येथे पती अनिल यांच्या साथीने शेतीला नवी दिशा दिली. मेहनत अंगवळणी असल्याने अवघड स्थितीतही पदर खोचून त्या उभ्या राहिल्या. पंधरा एकर बागायतीमध्ये केळी, कापूस आदी पिके जोमात येऊ लागली.

पुढे २५ एकरांपर्यंत शेती वाढविली. घराला घरपण आणि समृद्धी चालून आली. मुलगा भूषण याने रोपवाटिका सुरू केली. पॉलिहाउस, शेडनेटमध्ये शेती वाढली. कलिंगड, खरबूज, रंगीत ढोबळी मिरची, संकरित काकडी पिकांची लागवड सुरू झाली.

Aadarsh Sarpanch
Rural Development : आत्मनिर्भर देशासाठी आत्मनिर्भर ग्रामपंचायत

या सर्व शेतीचे व्यवस्थापन शारदाताई सांभाळतात. शेती, पिके, खर्चाच्या नोंदी त्यांच्याकडे असतात. बाजार सावध करतो, त्यानुसार पीकपाणी असावे, सावध तो सुखी, अशी सूत्रे त्यांनी घरात राबविली आहेत.

वाघूर धरणामुळे हिंगणे बुद्रुक गावाचे २००६ मध्ये पुनर्वसन झाले. सलग दहा वर्षे या गावाच्या सरपंचपदी शारदाताई कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात गावाने आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम, निर्मल ग्राम आणि ‘आदर्श गाव’ पुरस्कार पटकवला.

जळगाव जिल्ह्यात हिंगणे बुद्रुक हे राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे एकमेव गाव आहे. सरपंचपदाच्या कार्यकाळात स्वच्छता व ग्रामआरोग्यावर त्यांनी लक्ष दिले. पायाभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करून कामे पूर्ण केली. महिला सन्मानाबाबत त्या नेहमी जागरूक आहेत.

दारिद्र्य रेषेखालील ग्रामस्थांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या १०० टक्के ग्रामस्थांना पक्की घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळाली. लोकसंख्येच्या घनतेनुसार जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक वृक्षांची लागवड आणि संगोपन हिंगणे बुद्रुक गावाने केले आहे.

Aadarsh Sarpanch
Rural Development : सरपंच, सदस्यांनो... सक्षमपणे करा गावाचा कारभार

त्याची दखल घेऊन तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गावाला पुरस्कार देण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेचा त्यांनी विकास केला. शाळा डिजिटल झाली. त्यामुळे मुलांना शिक्षणाची नवी दालने उपलब्ध झाली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com