Glader's Disease : घोड्यांमधील ‘ग्लैंडर्स’ रोगामुळे शहादा तालुक्यात निर्बंध

शहाद्यात घोड्यांमध्ये ग्लैंडर्स या साथरोगाचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. हा साथरोग असून, रोगाचा प्रसार तालुक्यात किंवा जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
Glader's Disease
Glader's DiseaseAgrowon

Nandurbar News : शहाद्यात घोड्यांमध्ये ग्लैंडर्स या साथरोगाचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. हा साथरोग असून, रोगाचा प्रसार तालुक्यात किंवा जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

यामुळे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमनुसार शहादा तालुक्यांत संसर्ग केंद्रापासून ५ किलोमीटर परिघास बाधित क्षेत्र घोषित केले आहे.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून ५ कि. मी. परिघातील परिसरात घोडे व तत्सम खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा, प्रदर्शनांना प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

रोग प्रादुर्भाव भागातील पाच कि. मी. परिसरात अवागमन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद आणि सहाय्यक आयुक्त पशुसवंर्धन, तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय, शहादा यांनी ग्लैंडर्स नियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर करून योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही श्रीमती खत्री यांनी दिल्या आहेत.

Glader's Disease
Grape Orchard Management : अवकाळी पावसात द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन

करावयाच्या उपाययोजना

* बाधित जनावरास दयामरण, युथॅनासिया देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी

* मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. मृतदेहाच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकावी

* बाधित जनावराच्या संपर्कात आलेल्या जनावरांचे विलिगीकरण बंधनकारक राहील

* एसओपीनुसार बाधित क्षेत्राच्या केंद्र बिंदूपासून ५ कि. मी. त्रिज्येतील सर्व घोडे व तत्सम जनावरांचे सर्वेक्षण करून ३ आठवड्याच्या आत रोग नमुने घेऊन एनआरसीइ संस्थेस पाठवावेत. ही कार्यवाही पुढील दोन महिन्यात पुन्हा दोनवेळा २१ ते ३० दिवसाच्या अंतराने करावी.

बाधित गावे व तेथील पशुधन

शहादा तालुक्यातील भादे, डोंगरगांव, होळ, कुकडेल, लांबोळा, लोणखेडा, मलोनी, मनरद, मोहिदे त. श., मोहिदे त. ह., पिंगाणे, पुरुषोत्तमनगर, सावळदे, शहादा शहर, शिरुड दिगर, टेंभली, तिखोरे व ऊंटावद ही ५ कि.मी. परिघातील बाधित गावे असून, या गावांमध्ये ८ घोडे व ६ गाढवे असे पशुधन आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com