Cashew Processing : काजू प्रक्रिया धारक आणि उत्पादकांचे कर्ज पुनर्गठन करू

काजू उत्पादक संघ आयोजित महोत्सवासाठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. प्रस्तावनेमध्ये श्री. बारगिर यांनी काजू व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या.
Cashew Processing
Cashew ProcessingAgrowon

Ratnagiri Cashew News : काजू प्रक्रियाधारक (Cashew Processing) आणि उत्पादकांच्या कर्जांचे पुनर्गठनाचा प्रश्‍न पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सोडवला जाईल. यासाठी सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊ.

त्यावेळी लिड बँकेचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून आंबा बागायतदारांप्रमाणे काजू प्रक्रिया धारकांना दिलासा दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

एमआयडीसी येथील दळवी कॅश्यु प्रकल्पाजवळ आयोजित काजू महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अध्यक्ष विवेक बारगिर, संदेश दळवी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांच्यासह अन्य अधिकारी व काजू प्रक्रियादार उपस्थित होते.

काजू उत्पादक संघ आयोजित महोत्सवासाठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. प्रस्तावनेमध्ये श्री. बारगिर यांनी काजू व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या.

Cashew Processing
Cashew Crop Damage : असनिये येथील आगीत ६०० काजू कलमे जळाली

प्रक्रियाधारकांना कर्ज पुनर्गठनाची गरज आहे, त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. ओला काजू सुखवून साठवणुकीसाठी संशोधन झाल्यास शेतकऱ्यांना दोनशे रुपये अधिकचा दर मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, कृषीविषयक योजनांचा लाभ काजू उत्पादकांना मिळवून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल. कर्ज पुनर्गठनाबाबतचा प्रश्‍न नुकताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला. तसे झाले तर काजू प्रकिया उद्योगात वाढ करता येईल.

आंबा बागायतदारांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत बैठकीत तोडका काढण्यात आला आहे.

काजूला जीआय मानांकन द्या

शासनाने कर्जमाफी, सवलतीपेक्षा काजू लागवडीला प्रोत्साहन दिले पाहिजे. काजूला जीआय मानांकन मिळाले तर बाजारपेठ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

काजू उत्पादक आणि प्रक्रियाधारकांचे प्रश्‍न अधिवेशनात मांडून ते सोडविण्यासाठी कोकणातील आमदार प्रयत्न करतील, असा विश्‍वास आमदार निकम यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com