Kholsapada Dam : खोलसापाडा धरणासाठी लगबग

वसई विरार शहर महापालिकेला पेल्हार, उसगाव व सूर्या धामणी पाणीपुरवठा योजनेतून एकूण २३० एमएलडी पाणी साठा उपलब्ध होत आहे.
Kholsapada Dam
Kholsapada DamAgrowon

Vasai News : वसई-विरार शहर महापालिका (Vasai-Virar Municipal Corporation) क्षेत्रात सध्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे मुबलक पाणी नागरिकांना मिळावे म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.

तर दुसरीकडे भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून खोलसापाडा धरणात येत्या पावसाळ्यात पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी कृतिशील पावले उचलली जात आहेत.

वसई विरार शहर महापालिकेला पेल्हार, उसगाव व सूर्या धामणी पाणीपुरवठा योजनेतून एकूण २३० एमएलडी पाणी साठा उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात पुढील २० वर्षात वसई विरार शहराची लोकसंख्या ४५ लाख इतकी होणार असल्याची शक्यता आहे.

त्यामानाने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत विरार, नालासोपारा, वसईत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

Kholsapada Dam
Agriculture Irrigation : पालखेड धरण-कालव्याला मिळणार झळाळी

विरार पूर्व भागात जाणवणाऱ्या पाणी टंचाईबाबत बहुजन विकास आघाडीने पालिका आयुक्तांची भेट घेत पाण्याची समस्या मांडली, इतकेच नव्हे तर नागरिक देखील प्रशासनाची भेट घेत आहेत. त्यामुळे पाणी विभागाने पाण्याचे वितरण प्रत्येक प्रभागात कसे करता येईल याचे नियोजन करण्यावर भर दिला आहे.

सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर खोलसापाडा धरणाची पाहणी केली आहे. यासाठी योग्य नियोजन करून निविदा, कामाच्या सूचना यासह जुलै महिन्यात धरणात पाण्याची साठवणूक याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. जेणेकरून हे काम पूर्ण झाल्यावर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अतिरिक्त पाणी मिळेल.
अनिलकुमार पवार, आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com