Paddy Cultivation: भाताने वाढवली चिंता

मार्च ते एप्रिल दरम्यान आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे देशभरातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील गव्हाचे उत्पादन घटले. गव्हाची हमीभावाने (MSP) खरेदी करणाऱ्या भारतीय अन्न महामंडळालाही (FCI) अपेक्षेप्रमाणे गहू खरेदी करता आलेली नाही.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

गव्हासारखेच देशातील तांदळाचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार यंदा खरीप हंगामात (kharif season) भात लागवडीखालील क्षेत्रातही मोठी घट झालीय. ५ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातल्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांतील भात लागवडीत (Paddy Cultivation) १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

मार्च ते एप्रिल दरम्यान आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे देशभरातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील गव्हाचे उत्पादन घटले. गव्हाची हमीभावाने (MSP) खरेदी करणाऱ्या भारतीय अन्न महामंडळालाही (FCI) अपेक्षेप्रमाणे गहू खरेदी करता आलेली नाही. अशातच देशातल्या तांदूळ उत्पादक राज्यांतील भात लागवडीत मोठी घट झाल्याचे समोर आलेय. त्यामुळे यंदा देशातील तांदळाच्या उत्पादनातही मोठी घट होणार असल्याचे शक्यता आहे. वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले.

Paddy Cultivation
जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

केंद्रीय कृषीमंत्रालयाच्या (agriculture ministry) माहितीनुसार ५ ऑगस्टपर्यंत देशभरातील २७४.३० लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली. मागच्या वर्षी याच कालावधीत ३१४.१४ लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आले होती.

Paddy Cultivation
पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून : कालावधीवरून सरकार, विरोधकांत मतभेद

पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा या तांदूळ उत्पादक राज्यांतील भात लागवडीत घट झालीय. यातील काही राज्यांत सरासरीएवढा पाऊस न झाल्यामुळे खरीपाच्या पेरण्या (Kharif Sowing) रेंगाळल्या होत्या. जुलैमध्येही काही राज्यांत पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात ८ ऑगस्टपर्यंत सरासरी पावसाच्या ३६ टक्के कमी पाऊस झाला. पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीच्या ४३ टक्के पाऊस झाला. बिहारमध्ये सरासरीच्या ३८ टक्के तर झारखंडमध्ये ४५ टक्के एवढाच पाऊस झाला.पश्चिम बंगालमध्ये सरासरी पावसाच्या ४६ टक्के पाऊस झालाय.

Paddy Cultivation
शेतीमाल साठवणुकीच्या अत्याधुनिक सेवा द्या: अनिल कवडे

भारत हा जगातील प्रमुख तांदूळ निर्यातदार (Rice Exporter) देशांपैकी एक आहे. जगातिक तांदूळ निर्यातीच्या ४० टक्के तांदूळ भारतातून निर्यात होतो. २०२१-२०२२ (जुलै ते जून) या हंगामात भारताचे तांदूळ उत्पादन १२९. ६६ दशलक्ष टन होते. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने २१.२ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला.

Paddy Cultivation
Ethanol Production: इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण चार वर्षांत अकरापट

भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) तांदळाचा १३.५ दशलक्ष टन संरक्षक साठा अपेक्षित असताना १ जुलैपर्यंत भारतीय अन्न महामंडळाकडे ४७ दशलक्ष टन तांदळाचा साठा उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com