Rice Farming : दुबार भातपीक बहरले, मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातूर

रसायनी पाताळगंगा परिसरात दुबार भाताचे पीक निसवू लागले आहे. दोन दिवसांपासून खराब हवामान असल्यामुळे पिकाला धोका निर्माण होईल, या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहे.
Rice Farming
Rice Farming Agrowon

Rasayani News : रसायनी पाताळगंगा परिसरात दुबार भाताचे पीक निसवू लागले आहे. दोन दिवसांपासून खराब हवामान असल्यामुळे पिकाला धोका निर्माण होईल, या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहे. धोका टळला, तर यंदाच्या वर्षी चांगले पीक येईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

पाताळगंगातील चावणे पंचक्रोशीतील घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या जांभिवली गावाच्या हद्दीतील बामणोली धरणाचा पंचक्रोशीतील; तसेच पाताळगंगा नदी काठच्या गावांतील आणि मोहोपाडा येथील शेतकरी एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणार्!या सांडपाण्यावर दरवर्षी भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे.

चार- पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दुबार हंगामात भातपिकाला बसत आहे. विविध कारणांमुळे परिसरात दुबार लावणीचे क्षेत्रफळ घटू लागले आहेत.

Rice Farming
Rice Farming : पेणमधील हजारो एकर भातशेती पाण्यात

मात्र, या वर्षी दुबार भातपिकाची वाढ लावणी केल्यापासून चांगली झाली आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला; मात्र नंतर वातावरण निवळले. आता अनुकूल वातावरणाचा पिकाला चांगला फायदा झाला आहे.

मात्र, दोन दिवसांपासून वाढलेले तापमान आणि अधूनमधून ढगाळलेले वातावरण, अशा खराब हवामानामुळे पिकाला फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.

सध्या भाताचे पीक निसवत आहे, धोका टळला तर या वर्षी चांगले पीक येईल, अशी आशा बाळाराम कोडिंलकर आणि इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भाताची रोपे तरारली

पाली : माणगाव, रोहा, रसायनी आदी परिसरात काही ठिकाणी कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती केली जाते. सध्या भाताची रोपे चांगली तरारली आहेत.

त्यामुळे परिसरात गारवाही पसरला आहे. मुंबई-गोवा महामार्ग व इतर मार्गावरून जाणारे प्रवासी; तसेच पर्यटक येथे आवर्जून थांबून या नयनरम्य निसर्ग, गारवा व हिरव्यागार भाताच्या रोपांचा आनंद लुटतात.

पीक चांगले बहरल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती भरघोस पीक लागणार आहे. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेतीमध्ये शेतकर्!यास हुकमी पीक मिळते.

पावसाळ्यातील शेतीतून मिळणारे उत्पादन व उत्पन्नापेक्षा उन्हाळी शेतीतून अधिक चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी समाधानी असतात. काही शेतकरी तर पावसाळ्याऐवजी उन्हाळी शेती करण्यासच प्राधान्य देतात.

सध्या या भातशेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. शेती परिसरात पाणी व भातरोपांमुळे अधिक थंडावा निर्माण होतो. तसेच उन्हाचा तडाखा वाढल्यावर या भागात मात्र गारवा जाणवतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com