
Agriculture Development News नांदेड : चांगल्या रस्त्याच्या बांधणीतून (Road Construction) देशाला समृद्धीचा मार्ग गाठता येतो. या देशातील शेती, शेतकरी यांना खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर शेतीसाठी भक्कम रस्ते, भक्कम रस्त्यांच्या माध्यमातून कृषिपूरक उद्योगाला (Agriculture Business) चालना आणि उद्योगासाठी आवश्यक ठरणाऱ्या वाहतुकीच्या ऊर्जेसाठी जैवइंधन-बायोडिजेल (Bio Diesel), इथेनॉल (Ethanol), ग्रीन हॉड्रोजन (Green Hydrogen), बायो सीएनजीवर भर हा भविष्यातील समृद्धीचा मार्ग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतील समृद्ध भारताचा हाच मंत्र आहे. या कामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात शुक्रवारी (ता. २४) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नांदेड शहराला ऐतिहासिक वारसा आहे. येथील भूमी गुरुगोविंदसिंगजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. महाराष्ट्रातील आध्यात्मिक मार्ग समृद्ध व्हावा यावरही आम्ही भर दिला. यातूनच पंढरपूर-देहू-आळंदी हा महामार्ग आता पूर्णत्वास आला आहे.
महाराष्ट्रातील तीन शक्तीपिठांना जोडणारा महामार्गही पूर्ण होत आला आहे. रत्नागिरी ते नागपूर या सुमारे ३० हजार कोटी खर्चाच्या महामार्गात महाराष्ट्रातील कोल्हापूरची अंबाबाई-तुळजापूर येथील आईभवानी आणि माहूर येथील रेणुकामाता ही तीन शक्तीपिठे जोडली जात आहेत.
कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.