
Satara News : जिल्ह्यात शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) सहापदरीकरण करण्यासाठी रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
महामार्गालगतच्या पुलातून शेतातून करण्यात आलेल्या पाइपलाइन फुटण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनेही अडकून पडत असल्याने शेतकऱ्यांना मोट्या अडचणींना समोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग सहापदीकरणाचे काम सातारा जिल्ह्यात सुरू आहे. काम युद्धपातळीवर सुरू असल्याने महामार्गालगतची बहुतांशी झाडे तोडून टाकण्यात आली आहे. सध्या सपाटीकरण, भराव तसेच ओढ्यावरील लहान-मोठ्या पुलाची कामे सुरू करण्यात आली आहेत.
अपुरा व खंडित होणारा वीजपुरवठा (Electricity Supply) यामुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महामार्गालगतच्या पुलामधून शेतीच्या पाण्याच्या पाइपलाइन गेल्या आहेत. या अगोदर गॅसची पाइपलाइन नेताना शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.
त्यातच भर उन्हाळ्यात या पाइपलाइनचे नुकसान होणार असल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसणार आहे.
पिकांच्या नुकसानीमुळे डोकेदुखी
महामार्गालगत शेती असणे पूर्वी अभिमानाचे तसेच फायदेशीर ठरत होते. आता मात्र हे क्षेत्र शेती करण्यासाठी त्रासदायक ठरू लागले आहे. महामार्गालगत जाणारी गॅस पाइपलाइन, वेगवेगळ्या केबल, वीज वाहतूक खांब, रुंदीकरणाची कामे यामुळे मोठे नुकसान होत असते.
तसेच महामार्गाची उंची वाढल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने पिके पाण्याखाली जातात. यामुळे पिकांचे वांरवार नुकसान होत असल्याने महामार्गालगतची शेती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.