Robot In Farm : रोबोटमुळे शेतीचे चित्र बदलून जाईल...

सप्टेंबर 2017 मध्ये जॉन डिअरने ब्ल्यु रिव्हर टेक्नॉलॉजी कंपनी विकत घेतली. पुढील संशोधनासाठी अजून 305 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम या प्रयोगासाठी जॉन डिअर कंपनीने लावली आहे.
Robot For Agriculture
Robot For AgricultureAgrowon

- नानासाहेब पाटील

त्यांनी सी अॅन्ड स्प्रे नावाचा एक रोबोट (Spray Robot) तयार केला आहे. कपाशीच्या 9 (Cotton) शेतीत संगणकाच्या मदतीने तणांचा शोध घेत फवारणी करण्याचे तंत्र या रोबोटने (Robot) आत्मसात केले आहे.

या रोबोटमुळे अचूक फवारणीच्या माध्यमातून तणनाशक रसायनाची 80 टक्के बचत होते.  याशिवाय खर्चात देखील 90 टक्के बचत होते. 

सप्टेंबर 2017 मध्ये जॉन डिअरने ब्ल्यु रिव्हर टेक्नॉलॉजी कंपनी विकत घेतली. पुढील संशोधनासाठी अजून 305 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम या प्रयोगासाठी जॉन डिअर कंपनीने लावली आहे.

एमएफ स्कॅम्प रोबोट देखील आलेले आहेत. शेताचे रक्षण करणे, तणनियंत्रण आणि काढणी अशी तीनही कामे करण्यासाठी या रोबोटची रचना करण्यात आलेली आहे. या रोबोटला चाके आहेत. शेतातील तणांचा शोध घेवून तो तणांचा आराखडा तयार करतो आणि त्याच ठिकाणी फवारणी करतो.

यामुळे शेतात मजुरीचा, तणनाशकाचा आणि ट्रॅक्टर खर्चात देखील बचत होते. 

Robot For Agriculture
Tractor Market : 40-50 एचपीच्या ट्रॅक्टरची विक्री का वाढतेय ?

या रोबोटला जीपीएस जोडण्यात आलेला आहे. एपीआय प्लॅटफॉर्म हा रोबोट डेन्मार्कमध्ये चांगले काम करतो आहे. ताशी 3.6 किलोमीटर वेगाने काम करणाऱ्या या रोबोटला जीपीएस, जीआयएस, मोटार जोडण्यात आलेली आहे.

हा रोबोट देखील फवारणीची कामे करतो. अमेरिकेच्या अॅरिझोना आणि कॅलिफोर्निया भागात क्रु रोबोटिक कंपनीचा एक रोबोट दिवसाला 8 एकर स्ट्रॉबेरी तोडतो आणि 30 मजुरांचे काम एकाच वेळी करतो.

बर्लिनमधील एका स्टार्टअप कंपनीने बेटस नावाचे यंत्र तयार केले असून पाने आणि मातीच्या परिक्षणातून ते शेतजमिनीमधील अन्नद्रव्याची कमतरता ते शोधून काढते.

कॅलिफोर्नियाच्या ट्रेस जिनोमिक्सने आर्टिफिशियल इंटिलिजन्टसच्या आधारावर माती परिक्षणाची उत्तम प्रमाणी शोधून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शनाची सेवा सुरू केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com