
MLA Rohit Pawar Nagar News : महाराष्ट्रातील युवक-युवतींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरणनिर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ ही एक युवा चळवळ सुरू केली आहे. युवकांना त्यांच्या राज्याच्या विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवता येत आहेत.
राज्यातील विविध शहरांमधील महाविद्यालयांत जाऊन आमदार रोहित पवार हे तरुणाईशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक युवकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी व युवा रॅपर्स यांच्यामध्ये जरा वेगळेच समीकरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. अशातच रॅपच्या माध्यमातून तरुणाईला ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाबद्दल सांगण्यात आले आहे. अनेक वेळा रॅप म्हटले, की अर्वाच्य भाषा दिसते.
मात्र या महाराष्ट्र व्हीजन फोरमच्या रॅपमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने शब्दमांडणी करून उपक्रमाचा उद्देश आणि एकंदर संपूर्ण संकल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘रॅप साँग’च्या ट्रेंडचा वापर
तरुणाईच्या सध्याच्या काळातील ट्रेंड लक्षात घेऊन पवार यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र व्हिजन फोरम युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप साँग लॉँच केले आणि अल्पावधीतच ते व्हॉट्सॲप व इतरही समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. शुभम जाधव, अर्थात रॉकसन या उभरत्या रॅपरने हे गाणे गायिले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.