Rose Flower Farming : शेतकरी नियोजन पीक - गुलाब

‘व्हॅलेंटाइन डे’साठी दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्यासाठी मागील महिनाभरापासून नियोजन केले आहे. तसेच पुढील काही दिवस विविध कामांवर भर दिला जाणार आहे.
Rose Crop Planning
Rose Crop PlanningAgrowon

शेतकरी ः सुनील विष्णू घरदाळे

गाव ः कडधे. ता. मावळ जि. पुणे

एकूण शेती ः ८ एकर

गुलाब लागवड ः दीड एकर

Floriculture Management : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादन मावळ तालुक्यात होते. सध्या तालुक्यातील गुलाब उत्पादकांची ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या पार्श्वभूमीवर मोठी लगबग सुरू आहे. गुलाब फुलांना व्हॅलेंटाईनच्या काळात मोठी मागणी असते.

कडधे. (जि. पुणे) येथील सुनील विष्णू घरदाळे यांची एकूण आठ एकर शेती आहे. त्यात ऊस, गहू, भात अशा विविध पिकांचे उत्पादन ते घेतात. याशिवाय दोन एकरावर पॉलिहाऊसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेत आहेत.

मागील २० ते २५ दिवसांपासून ‘व्हॅलेंटाइन डे’ ला गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार पॉलिहाऊसमध्ये विविध कामांवर भर दिला आहे.

Rose Crop Planning
Rose Prunning : गुलाब छाटणीचे प्रकार आणि नियोजन

तालुक्यातील पवनानगर येथील पवनानगर फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून पॉलिहाऊसमध्ये विविध फुलांच्या रंगांच्या व जातींच्या गुलाबाचे उत्पादन सुनीलराव घेतात. यात मुख्यत्वेकरून व्हॅलेंटाइनसाठी लाल रंगाच्या (टॉप सिक्रेट जातीच्या) फुलांना जास्त मागणी असते.

या काळात बाजारात दरही चांगले मिळतात. ‘व्हॅलेंटाइन डे’साठी दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्यासाठी मागील महिनाभरापासून नियोजन केले आहे. तसेच पुढील काही दिवस विविध कामांवर भर दिला जाणार आहे.

व्यवस्थापनातील बाबी ः

१) ‘व्हॅलेंटाइन डे’ला गुलाब फुले उपलब्ध होण्यासाठी साधारणपणे १ डिसेंबरपासून तयारीस सुरवात केली आहे.

२) डिसेंबर महिन्यात कटिंग, बेंडिंग, क्लिपिंग अशा विविध कामांवर भर देण्यात आला. तसेच पॉलिहाऊसमध्ये योग्यरीत्या मशागत करण्यात आली.

३) फुलांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गुलाब लागवडीत सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर दिला जातो.

४) ‘व्हॅलेंटाइन डे’ पूर्वी दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळविण्यासाठी दररोज पॉलिहाऊसमध्ये जाऊन फुलांची पाहणी करत होतो.

Rose Crop Planning
Flower Farming : मुदखेडला फूल उत्पादक शेतकऱ्‍यांचे आंदोलन

५) निर्यातक्षम गुलाब उत्पादनासाठी पिकाची वेळोवेळी पाहणी करून आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणीवर भर देण्यात आला.

६) यंदा सततच्या हवामान बदलामुळे गुलाब शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी खर्चात दुप्पट वाढ झाली असल्याचे सुनीलराव सांगतात.

७) दरवर्षी साधारणपणे २० ते २६ जानेवारी या काळात देश आणि परदेशातील व्यापारी पॉलिहाऊसवर येऊन निर्यातक्षम फुलांची पाहणी करतात. फुलांची पाहणी केल्यानंतर त्यांची किंमत ठरवून बुकिंग केले जाते.

Rose Crop Planning
Rose Prunning : गुलाब छाटणीचे प्रकार आणि नियोजन

८) फुलांची विक्री प्रामुख्याने गुवाहाटी, नागालॅंड, कोलकता, जम्मू, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, पणजी, बंगलोर, हैदराबाद, पटणा, इंदोर, छत्तीसगड, नागपूर, अमरावती, भंडारा, मुंबई, पुणे या ठिकाणी फुलांची विक्री केली जाते.

९) बाजारात चांगल्या प्रतीच्या गुलाब फुलांना दरही चांगला मिळतो. साधारण २० फुलांच्या गुलाब गड्डींला २५० ते ३०० रुपये दर मिळतो आहे. निर्यातक्षम गुलाबास प्रति गुलाब १२ ते १३ रुपये दर मिळतो.

आगामी नियोजन

१) सध्या गुलाब फुलांच्या पॅकिंगची तयारी, पॉलिहाऊसची स्वच्छता ही कामे चालू आहेत.

२) देशासह परदेशात २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात फुलांची निर्यात केली जाते. त्यानुसार सध्या पॉलिहाऊसमध्ये कामकाज सुरु आहे.

३) गुलाब फुलांची निर्यात ३० जानेवारीपासून सुरू झाली आहे. फुलांचा दर्जा चांगला राखल्यामुळे मागणी वाढत आहे.

४) हॉलंड, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांत गुलाबाची निर्यात होत असते.

५) या वर्षी थंडीचे प्रमाण कमी जास्त असल्यामुळे गुलाब उत्पादनात घट झाली आहे. तसेच फुले वेळेआधीच उमलत आहेत.

६) पवनानगर फूल उत्पादक संघाने या वर्षी ५ लाख गुलाब फुलांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार काम सुरु आहे.

७) पॉलिहाऊसमधून एकरी साधारण ४० हजार निर्यातक्षम गुलाब फुलांचे उत्पादन मिळते. त्यापासून एकरी ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

सुनील घरदाळे, ९२८४६२५५९५ (शब्दांकन ः संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com