पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर आलेल्या सदाभाऊंची ‘पंचाईत’

हॅाटेलच्या थकीत बिलासाठी अडवली गाडी
पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर आलेल्या सदाभाऊंची ‘पंचाईत’
Sadabhau KhotAgrowon

सोलापूर ः पंचायत राज समितीचे सदस्य असलेले माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत हे गुरुवारी (ता. १७) दुपारी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले होते. पण या दौऱ्यात एका हॅाटेल मालकाने त्यांची गाडी अडवत २०१४ च्या निवडणुकीतील हॉटेलची उधारी देण्याची मागणी केल्याने अचानकपणे उद्भवलेल्या या प्रसंगाने सदाभाऊंची चांगलीच ‘पंचाईत’ झाली. दरम्यान, आपल्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याचं हे षड्‍यंत्र असून, आपण कसलेच देणे लागत नसल्याचं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (ता. १७) पत्रकार परिषद घेत दिले.

पंचायत राज समिती सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. या समितीमध्ये आमदार खोत यांचाही समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही समिती जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात भेटी देत बैठका घेत आहे. त्यानुसार गुरुवारी ही समिती सांगोला दौऱ्यावर आली. तेव्हा बैठकीतून बाहेर येताना रस्त्यावरच गाडी अडवत मामा-भाचे हॅाटेलचे मालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊंना ‘आधी माझी उधारी द्या, मग पुढे जा,’ असा पवित्रा घेतला. शिनगारे यांच्या म्हणण्यानुसार ६६ हजार ४४५ रुपयांची बिलं थकल्याचं म्हणणं होतं. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. त्यावेळी त्यांची समजूत काढत सदाभाऊ कसेबसे निसटले. पण अचानकपणे उद्‍भवलेल्या या प्रसंगाने त्यांची चांगलीच पंचाईत झाली. आता मात्र शासकीय कामात अडथळा आणल्याचे कारण देत संबंधित हॅाटेल मालक शिनगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे षड्‍यंत्र, पण मी घाबरणार नाही

दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात शुक्रवारी (ता. १७) पत्रकार परिषद घेत, हॉटेलमालकाचे हे आरोप फेटाळून लावले. हा राजकीय स्टंट असून, आपण त्या हॉटेलात कधी गेलोच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याचं हे कारस्थान आहे. संबंधित हॅाटेल मालक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून, गुन्हेगार, वाळूमाफिया आहे, असा आरोप केला. पण या दबावाला, धमक्यांना मी कधीच घाबरणार नाही, असेही खोत म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com