Sahyadri FPC: सह्याद्री एफपीसी उभारणार खासगी बाजार समिती

महाराष्ट्रातील आघाडीची शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची (FPC) ओळख आहे. नाशिक येथील या एफपीसीने खासगी बाजार समिती सुरू करण्याचा परवाना मिळवलाय.
Shyadri FPC
Shyadri FPC Agrowon

महाराष्ट्रातील आघाडीची शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची (Sahyadri FPC) ओळख आहे. नाशिक येथील या एफपीसीने खासगी बाजार समिती (Private APMC) सुरू करण्याचा परवाना मिळवलाय. ही बाजार समिती नाशिकच्या दिंडोरीत उभी राहणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीने उभारलेली ही देशातील पहिलीच खाजगी बाजार समिती (India's First Private APMC) असेल.

Shyadri FPC
Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणात राज्याची देशात आघाडी

पुढच्या तीन महिन्यांत या बाजार समितीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुमारे शंभर एकर जागेत ही खासगी बाजार समिती उभारली जाईल. या ठिकाणी शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, बँकिंगपासून स्टोरेज, प्रक्रिया आणि पॅकेजिंगपर्यंतच्या सर्व सेवा एकाच छताखाली मिळतील, असे सांगण्यात आले. ऑफलाइन आणि ऑनलाइन ट्रेडिंग ऑप्शन्सही उपलब्ध असतील.

Shyadri FPC
Indian Agriculture : पोटासाठी शेतकरी बनला हमाल; शेतीचे प्रयोगही सुरू

या बाजार समितीत लिलाव आणि साठवण सुविधा तयार केल्या जात आहेत. सुमारे ९० टक्के पायाभूत सुविधा आधीच अस्तित्वात आहेत. सह्याद्री एफपीसीकडे द्राक्षे आणि मनुका यासाठी चार हजार टन साठवण क्षमता उपलब्ध आहे. आणखी २० हजार टन साठवण क्षमतेचे स्टोरेज तयार केले जात आहेत. फलोत्पादन पिकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

Shyadri FPC
APMC Election : निवडणूक सुधारणा नक्की कशासाठी?

फळपिकांचे शक्यतो शिवार सौदे होतात. त्यात फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होतात. व्यापारी पैसे बुडवून पळून गेल्यामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना असे अनुभव जास्त येतात. सह्याद्री उभारत असलेल्या खासगी बाजार समितीत अशा प्रकारांना चाप बसेल, असे सांगण्यात आले. पारंपारिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ठराविक घटकांची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते.

सह्याद्रीच्या बाजार समितीमध्ये सर्व व्यवहार आणि प्रक्रिया पारदर्शक राहणार असून मक्तेदारीला शह बसेल, असे सांगण्यात आले. सह्याद्री एफपीसीने ऑनलाइन ट्रेडिंगसाठी खास सॉफ्टवेअर तयार केलं आहे. त्या माध्यमातून सदस्यांना एंड-टू-एंड इकोसिस्टम पुरवली जाईल.

नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. परंतु तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षांचे व्यवहार फारसे होत नाहीत. थेट व्यापाऱ्यांशी केल्या जाणाऱ्या सौद्यांचे प्रमाण अधिक आहे. सह्याद्री एफपीसीच्या बाजार समितीच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध होणार आहे. खासगी बाजार समितीमुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com