Salam kisan : सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्सच्या मदतीने यवतमाळच्या शेतकऱ्याची हरभरा शेतीत मोठी झेप

वरद क्रॉप सायन्सच्या मदतीने आणि सलाम किसानच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी अब्दुल मलिक खान हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

महाराष्ट्रातील शेतकरी अनेक वर्षांपासून शेती करतात. वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतो. परंतु त्याला योग्य मार्गदर्शनाअभावी समाधानकारक उत्पादन मिळत नाही.  ही स्थिती आजही कायम आहे. 

आज इंटरनेटचे युग आहे. या युगामध्ये शेतकरीही काळानुसार बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये सलाम किसान या समूहाने एप्लीकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागेल, त्या सुविधा एका छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. सलाम किसानला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

वरद क्रॉप सायन्सच्या मदतीने आणि सलाम किसानच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी अब्दुल मलिक खान हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील राहवासी आहेत.  

या शेतकऱ्याच्या शेतातील हरभरा सगळ्यांचे लक्ष  वेधून घेत आहे. हरभऱ्याच्या प्रत्येक झाडाला जवळपास १२५० घाटे बघावयास मिळतात.

अब्दुल खान यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या पिकाचे श्रेय ते वरद क्रॉप सायन्स च्या उत्पादनांना आणि सलाम किसानच्या मार्गदर्शनाला देतात.

या शेतकऱ्याने पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंत वरद क्रॉप सायन्सच्या उत्पादनांचा वापर केला आहे. ही उत्पादने सलाम किसानने सुचवली होती.

त्यामुळे अब्दुल खान यांना हरभऱ्याचे एकरी २५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळण्याची अशा आहे, असा दावा त्यांनी केला.

शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्पादने वापरतात परंतू त्यांना समाधानकारक फरक पिकांवरती दिसून येत नाही.

त्या ठिकाणी सलाम किसान हे शेतकऱ्याला सांगते की शेतकऱ्याचे चुकते कुठे? काय करायला हवं? कोणती उत्पादने वापरायला हवीत?  यासाठी दिशादर्शक म्हणून काम करते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com