Salam Kisan: सलाम किसान ठरतोय शेतकऱ्यांचा वाटाड्या

`सलाम किसान`मुळेजुन्या-जाणत्या लोकांनाही डिजिटल माध्यमाची गोडी लागली, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

जुनी पिढी नवीन पिढीला (New Generation) नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून डिवचत असते. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे तरूण पिढीचं मोबाईल वेड. (Mobile Addiction) तरूण पोरं-पोरी सारखं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात, अशी तक्रार केली जाते. परंतु `सलाम किसान`मुळे (Salam Kisan) जुन्या-जाणत्या लोकांनाही डिजिटल माध्यमाची गोडी लागली, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

‘सलाम किसान' हे एक सुपरॲप असून त्या माध्यमातून शेती मूल्यसाखळीतील (Agriculture Value Addition) सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.

खरं तर सध्याच्या इंटरनेटच्या युगात शेतकऱ्यांसाठी अनेक माध्यमं सेवा देत आहेत. परंतु यात ‘सलाम किसान'ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या माहितीच्या गरजा नेमकेपणाने ओळखून त्यांना अचूक आणि उपयुक्त माहिती देण्याचं काम या सुपरअॅपच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची त्याला वाढती पसंती मिळत आहे.

Salam Kisan
Salam Kisan: सलाम किसान हे सुपरॲप इतरांपेक्षा वेगळे कसे?

आज बाजारामध्ये अनेक कृषिविषयक कंपन्या स्वतःची उत्पादने आणि सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. त्यातील काहींची गुणवत्ता उत्कृष्ट असते तर काहींची दुय्यम असते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जणू कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी ‘सलाम किसान' प्रयत्नशील आहे. यामध्ये प्रामुख्याने मोबाईलवर अॅपद्वारे लिखित मजकूर आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती पुरवली जाते.

Salam Kisan
Salam Kisan: गावात रोजगारनिर्मितीसाठी ‘सलाम किसान'चा हातभार

‘सलाम किसान'चे वैशिष्ट्य काय?

गेल्या पाच वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला आहे. वातावरण बदलाचा फटका शेतीला बसत आहे. पिकांवर किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांना थेट फटका बसतो. अशा वेळी शेतकऱ्यांना तत्परतेने मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे, या भावनेतून ‘सलाम किसान'ची संकल्पना रूजली आहे.

या सुपरअॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक दिनदर्शिका, माती परीक्षण, ड्रोन सुविधा, कीड व रोगांचे निदान आणि व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञानंचा सल्ला, बाजार भाव, बाजारपेठेशी जोडणे, वाहतूक सुविधा, कृषिविषयक बातम्या, सलाम किसान शॉप, वित्तीय मार्गदर्शन इत्यादी अनेकविध सेवा पुरवल्या जातात.

आजघडीला शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादनं वापरत असतात. परंतु बऱ्याच वेळा त्यांना समाधानकारक परिणाम मिळत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांचं नेमकं चुकतं कुठं, काय करायला हवं, कोणती उत्पादनं वापरायला हवीत, नवीन तंत्र वापरताना काय काळजी घ्यायला हवी, पीक व्यवस्थापनात काय पथ्यं पाळायला हवीत ही माहिती वेळेवर मिळाली तर या अडचणींवर मात करणं शक्य होतं. या आघाडीवर शेतकऱ्यांसाठी मुलभूत स्वरूपचां काम करण्याचा ‘सलाम किसान'चा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं.

शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक

महाराष्ट्रातील शेतकरी प्रयोगशील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी निरनिराळी पिकं घेत आहेत. परंतु बदललेल्या परिस्थितीत नेमके मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना समाधानकारक उत्पादन मिळत नाही.

अशा शेतकऱ्यांसाठी ‘सलाम किसान'ची सेवा उपयुक्त ठरेल; त्यातून प्रगतीशील शेतकरी उभे राहतील, असा कंपनीचा दावा आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी वाटाड्या म्हणून हे सुपरअॅप कामगिरी बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक आहेत. प्रद्युमन मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com