Salam Kisan: ‘सलाम किसान' पुरवणार शेतकऱ्यांना विविध सेवा

‘सलाम किसान'च्या माध्यमातून शेतकऱ्यानी प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान (Modern Agriculture Technology) आणि सेवांचा पुरवठा (Agriculture Services) करून त्यांना सक्षम करण्यासाठी ‘सलाम किसान' (Salam Kisan) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सलाम किसान' हे एक सुपरॲप (Salam Kisan Super App) असून शेती मूल्यसाखळीतील (Agriculture Value Chain) सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

Salam Kisan
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

‘सलाम किसान'च्या माध्यमातून शेतकऱ्यानी प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शेतीतील उत्पादनखर्च कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश त्यामागे आहे. शेतीमध्ये येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करणे, युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे, महिला वर्गाला सक्षम करून त्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून ‘सलाम किसान'ने कामाची आखणी केली आहे.

सलाम किसान कोणत्या सेवा पुरवते?

हवामान अंदाज: शेतकऱ्यांना मिळेल दररोज हवामान अंदाजविषयक माहिती.

पीक दिनदर्शिका: शेतकऱ्यांना पिकांबद्दल लागवडीपासून ते काढणीपर्यंत मिळेल संपूर्ण माहिती.

माती परीक्षण: कमी वेळेत व कमी खर्चात करता येणार मातीचे परीक्षण.

ड्रोन सुविधा: ‘सलाम किसान'च्या मदतीने ड्रोनमुळे शेतात फवारणी करणे सोपे होईल.

पीकसंरक्षण: कीड व रोग व्यवस्थापनासाठी सर्वंकष मदत.

Salam Kisan
Agriculture Supply Chain : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

कृषी तज्ज्ञांचा सल्ला: ‘सलाम किसान'चे कृषी तज्ज्ञ देणार शेतीबद्दल वेळोवेळी सल्ला.

बाजार भाव: दररोजच्या बाजार भावाबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

बाजार उपलब्धता: ‘सलाम किसान'च्या मदतीने शेतकऱ्यांना बाजाराबद्दल माहिती देण्यात येईल.

वाहतुक सुविधा: शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ‘सलाम किसान'च्या मदतीने शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

बातम्या: कृषी क्षेत्रातील घडामोडींची माहिती, बातम्या शेतकऱ्यांना मिळतील.

सलाम किसान शॉप: ‘सलाम किसान'च्या मदतीने शेतीसाठी लागणारी सर्व उत्पादने एकाच जागेवर उपलब्ध करून देण्यात येतील.

वित्त मार्गदर्शन: शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत आधार मिळवून देण्यासाठी ‘सलाम किसान'च्या वतीने मदत करण्यात येईल.

‘सलाम किसान'च्या या सर्व सेवांमुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. त्यांची शेती किफायतशीर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ‘सलाम किसान'कडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. भविष्यातील तंत्रज्ञान आधारित शेती व्यवसायाला अपेक्षित असणारी ‘इकोसिस्टिम' उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक आहेत. प्रद्युमन मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com