Rabi Season : रब्बी पिकांच्या बारा हजार क्विंटल बियाण्यांची विक्री

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरून यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता. २) पर्यंत विविध पिकांच्या मिळून एकूण ११ हजार ९३० क्विंटल बियाण्याची तसेच विविध ग्रेडच्या ९ हजार ६३० टन रासायनिक खतांची विक्री झाली.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

परभणी ः जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरून यंदाच्या रब्बी हंगामात (Rabi Season) मंगळवार (ता. २) पर्यंत विविध पिकांच्या (Crop) मिळून एकूण ११ हजार ९३० क्विंटल बियाण्याची तसेच विविध ग्रेडच्या ९ हजार ६३० टन रासायनिक खतांची विक्री झाली. विविध पिकांचे ११ हजार ४१८ क्विंटल बियाणे आणि विविध ग्रेडचा २३ हजार ४३२ टन खतसाठा शिल्लक होता, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ७८ हजार ३९८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात हरभरा १ लाख ३७ हजार ९०६ हेक्टर, गहू ३७ हजार ३८६ हेक्टर, ज्वारी ९९ हजार ९४० हेक्टर, करडई १ हजार ११६ हेक्टर, सूर्यफूल २३.२५ हेक्टर, मका १ हजार ६२८ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्यासाठी विविध पिकांच्या ५३ हजार ३७३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.

Rabi Season
Sugar Export : साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय

त्यात सार्वजनिक क्षेत्रातील (महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ) बियाणे उत्पादकांकडे २६ हजार ५६ क्विंटल आणि खासगी क्षेत्रातील बियाणे उत्पादक कंपन्यांकडे २७ हजार ३१ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. मंगळवार (ता. २) पर्यंत सावर्जनिक कडून १० हजार १५० क्विंटल आणि खाजगींकडून १३ हजार१९८ क्विंटल असा एकूण २३ हजार ३४८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला.

सार्वजनिक क्षेत्रातील ४ हजार ९३० क्विटंल आणि खाजगीचे ७ हजार क्विंटल मिळून एकूण ११ हजार ९३० क्विंटल बियाण्याची विक्री झाली.सार्वजनिकचे ५ हजार २२० क्विंटल आणि खाजगीचे ६ हजार १९८ क्विंटल मिळून एकूण ११ हजार ४१८ क्विंटल बियाणे शिल्लक होते.

Rabi Season
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

साडेनऊ हजार टन खतांची विक्री...

यंदाच्या रब्बी हंगामासाठी १ लाख ३ हजार ८०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात ५८ हजार ४३० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. ३० सप्टेंबर अखेर एकूण २६ हजार ७०२ टन खतसाठा शिल्लक होता. ऑक्टोंबर पासून विविध ग्रेडचा ६ हजार ३४४ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण ३३ हजार ४६ टन खतसाठा उपलब्ध झाला. त्यापैकी ९ हजार ६१४ टन खतांची विक्री झाली.

त्यात युरिया २ हजार ८४२ टन, डिएपी १ हजार ७६७ टन, पोटॅश ६२ टन, संयुक्त खते (एनपीके) ३ हजार ८७० टन, सिंगल सुपर फॉस्फेट १ हजार ७३ टन या खतांचा समावेश आहे. शिल्लक खतांमध्ये युरिया ९ हजार ५३४ टन, डिएपी १ हजार ४५२ टन, पोटॅश ३५२ टन, एनपीके ८ हजार १७९ टन, सुपर फॉस्फेट ३ हजार ९१५ टन या खतांचा समावेश होता.

रब्बी बियाणे मागणी, पुरवठा,विक्री स्थिती (क्विंटलमध्ये) पीक मागणी पुरवठा विक्री शिल्लक

हरभरा ३६२०० .२१२०३ १११९५ १०००८

गहू १४९५४ ४१३ ०० ४१३

ज्वारी १८९८ १५१० ६४० ८७०

करडई ५० २१४ ९५ ११९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com