
Nagar Sand News : मुळा नदीतील बारा गावांच्या शिवारातील वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या निविदेला विरोध करत सरपंच व गावकऱ्यांनी तीव्र अंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासन अखेर नरमले.
वाळू उपसा करण्यासाठीच्या निविदेला स्थगिती दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील मुळा नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा सरकारी डेपो सुरू करण्यासाठी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने अंमळनेर व निंभारी येथे वाळू डेपोची निर्मिती, साठा करणे, व्यवस्थापन व विक्रीबाबत वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध केल्या.
मुळात नेवासा तालुक्यातील अंमळनेर, निंभारी, वांजळपोयी, शिरेगाव, खेडले परमानंद, करजगाव, खुपटी, पाचेगाव, इमामपूर, वाटापूर, आदी गावांत तीव्र विरोध सुरू झाला. एोव
वाळूचा उपसा होऊ नये यासाठी या भागातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेत वाळू उपशाला विरोध करून ठराव शासनाला पाठवले. शासनाच्या निविदा प्रक्रियेला सातत्याने विरोध करत निवेदनही दिली. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने निविदा प्रक्रिया काढली. यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन केले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संपर्क केला. विखे यांनी वाळूची निविदा प्रक्रिया व उत्खनन करण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
निविदा स्थगित झाल्याचे समजताच जल्लोष साजरा करण्यात आला. सरपंच दत्तात्रेय वरुडे, सरपंच श्रीकांत पवार, सरपंच राजेंद्र राजळे, सरपंच निरंजन तुवर, तिळापूर, मांजरी, सरपंच उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.