Kurduwadi Market Committee : कुर्डुवाडी बाजार समितीच्या सभापतिपदी संजय शिंदे

Market Committee Update : माढा तालुक्यातील कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार संजय शिंदे यांची, तर उपसभापतिपदी सुहास पाटील-जामगावकर यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली.
Kurduwadi Market Committee Chairman
Kurduwadi Market Committee Chairman Agrowon

Market Committee Solapur News : माढा तालुक्यातील कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार संजय शिंदे यांची, तर उपसभापतिपदी सुहास पाटील-जामगावकर यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली.

Kurduwadi Market Committee Chairman
Jalgaon Jamod Market Committee : जळगाव जामोद कृषी बाजार समिती सभापतिपदी प्रसेनजित पाटील

नूतन सभापती, उपसभापती निवडीसाठी ही बैठक पार पडली. या दोन्ही पदासाठी अनुक्रमे आमदार शिंदे आणि उपसभापती पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

या निवडीनंतर आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते नव्याने निवडलेल्या सभापती, उपसभापतींसह सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी रणजितसिंह शिंदे, दादासाहेब पाटील, बंडू ढवळे, संजय पाटील, पोपट गायकवाड यांचेसह नूतन संचालक सुरेश बागल, उत्कर्ष देशमुख, रमेश पाटील, शिवाजी पाटील, हनुमंत पाडुळे, दिलीप भोसले, निकिता खटके, सुमन मोरे, अमोल देवकर, संतोष अनभुले, पोपटलाल दोभाडा, सतीश सुर्वे, नागनाथ पाटील, डॉ. विजयकुमार लोंढे, किसन पाटील व रामभाऊ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नूतन सभापती शिंदे यांनी या सत्कारानंतर बाजार समितीला आणखी प्रगतिपथावर नेण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com