संन्यस्थ वड

सात जन्माचं माहिती नाही, पण या जन्मी तू भरभरून जग. सत्यवानाचे प्राण पुराणातल्या सावित्रीने आणले ही कथा आपण ऐकतो. पतीच्या प्राणात समर्पण केलं ते जोतिबांच्या सावित्रीनं.
संन्यस्थ वड
मशागत लेखAgrowon

ज्योती आधाट/तुपे

सात जन्माचं माहिती नाही, पण या जन्मी तू भरभरून जग. सत्यवानाचे प्राण पुराणातल्या सावित्रीने आणले ही कथा आपण ऐकतो. पतीच्या प्राणात समर्पण केलं ते जोतिबांच्या सावित्रीनं. आजची स्त्री ही पतीच्या खांद्याला खांदा लावून

प्रत्येक क्षणी धाडसाने जगतेय. संसाराची धुरा सांभाळत ती नोकरी, व्यवसाय एखाद्या उद्योगातील तिच्या भूमिका ती अगदी सहज लीलया पार पाडत असते. वटपौर्णिमेनिमित्त ती वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करते. आणि सात जन्म हाच पती मला मिळू दे. पतीचे आरोग्य चांगले राहू दे. अशी प्रार्थना करते. खरं तर मनुष्य जन्म एकदाच असतो.

सात जन्मापेक्षा याच जन्मी दोघांनी एकमेकांशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, ओढीनं वागल तर? वडाचं झाड हे निसर्ग साखळीतील आत्मा आहे. या झाडापासून खूप ऑक्सिजन मिळतो. हा वड एखाद्या संन्यस्थ ऋषीप्रमाणे सतत सेवेसाठी वर्षानुवर्षे उभा आहे. आज खूप ठिकाणी वडाची झाडे आवडीने लावून त्याचे संवर्धनही केले जाते. आपणा सर्वांना माहिती आहे, की निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।

वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

अशीही प्रार्थना केली जाते. कुठल्याही सणाविषयी किंवा एखाद्या परंपरेविषयी पुराणातील गोष्टीही विज्ञानाशी पडताळून पाहिल्या तर प्रत्येक सणांमागचं विशेषत्व आपल्या लक्षात येईल. अशीच वडाची माहिती वाचत असताना या झाडाची महती समजली. वडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात. या वृक्षाचा कधीच क्षय होत नाही. ते सतत वाढतच असते. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात व वडाच्या झाडाचा विस्तार होतो. त्यामुळे त्याचे आयुष्य उदंड असते. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग तयार होण्यासाठी व हवेत आर्द्रता व गारवा निर्माण होण्यासाठी होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पडण्यास मदत करणे हेदेखील वडामुळे होते. मग लावूयात एक वटवृक्ष!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com