Organic farming : आरोग्यदायी उत्पादनातून स्वतःसह ग्राहकांनाही केले समाधानी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रताप बनकर यांनी १८ वर्षांपासून सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. मिश्रपीक पद्धती, देशी बियाणे, देशी गोसंगोपन व सेंद्रिय निविष्ठांचा वापर याद्वारे २५ ते ३० हून अधिक पिकांचे आरोग्यदायी उत्पादन ते घेत आहेत.
Organic farming
Organic farmingAgrowon

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रताप बनकर यांचे वडील निवृत्ती काशिनाथ बनकर पारंपरिक पद्धतीने शेती (Farming) करायचे. सन २००० मध्ये वनस्पतिशास्त्र विषयातून त्यांनी पदवी घेतली. नोकरीच्या संधी होत्या.

पण लहानपणापासून शेतीचीच आवड असल्याने पूर्णवेळ त्यातच काम करणे पसंत केले. द्राक्ष व भाजीपाला ही मुख्य पिके (Crop) होती. भाऊ विलास यांच्यासोबत शेतीत कालानुरूप बदल केले. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची जोड देत बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन पीक पद्धतीची निवड केली.

Organic farming
Organic Farming : अक्षयकल्प ऑर्गनिकमध्ये पडणार १८०० नव्या फार्म्सची भर

सेंद्रिय शेतीचे प्रयोग

रासायनिक निविष्ठांच्या अतिवापरामुळे पर्यावरण, मानवी आरोग्य व मातीची होणारी हानी लक्षात घेऊन सुमारे १८ वर्षांपूर्वी प्रताप यांनी सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. गुजरात, राजस्थान. मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यांना भेटी देऊन तेथील प्रयोग, संकल्पना समजून घेतल्या. त्यांची एकूण शेती ३८ एकर असून, पैकी सात एकरांत शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाते.

त्यातील साडेचार एकरांत मिश्र पद्धतीने ३० हून अधिक प्रकारचा बारमाही भाजीपाला घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात रासायनिक व सेंद्रिय अशी एकात्मिक शेती केली जाते. सुरवातीच्या काळात सेंद्रिय पद्धतीत काही वर्षे नुकसान वाट्याला आले. मात्र बनकर कुटुंबाने धीर सोडला नाही. सर्व सदस्य कायम सोबतीला असल्याने आत्मविश्‍वास वाढत गेला.

आजची शेती दृष्टिक्षेपात

-उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी बहुपीक पद्धती. (मिश्रशेती)

-देशी वाणांचा वापर. त्यांची रोगप्रतिकारक व पौष्टिकता चांगली असते.

-साडेचार एकरांत पुढील मिश्र पद्धतीचा अवलंब.

पालेभाज्या- उदा. पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, लाल व हिरवा माठ, मोहरी, करडई, तांदुळजा, पुदिना, अळू

Organic farming
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

कंदवर्गीय- बीट,मुळा, रताळी, कांदा, लसूण,

मसाला- आले, हळद

वेलवर्गीय : कारले, दोडका, गिलके, भोपळा, तोंडली, घेवडा, वालपापडी, कोहळा

-फळभाजी : फ्लॉवर, कोबी, वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी

-प्रत्येक पीक दीड ते दोन गुंठे

-याशिवाय तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, तूर, उडीद, मूग, कुळीथ, भुईमूग, खुरसणी, करडई, सूर्यफूल व पेरूचेही सेंद्रिय प्रयोग.

रासायनिक- सेंद्रिय एकात्मिक पद्धती

-टेबल ग्रेप्स- (सोनाका) ३ एकर. (उत्पादन एकरी १२ ते १४ टन)

-वाइन द्राक्षे (झिंफांडेल) २.५ एकर

-पेरू...तैवान पिंक- ३ एकर. (उत्पादन एकरी १२ टन ते त्यापुढे)

-टोमॅटो- २.५ एकर. (एकरी २० टनांच्या पुढे)

-ऊस- दीड एकर.

Organic farming
Sugar Cane Factory : ‘श्री संत एकनाथ घायाळ शुगर’चा गळीत हंगाम प्रारंभ

शेती व्यवस्थापन वैशिष्ट्ये ः

- प्रयोगशीलतेतून उत्पन्न मिळत राहिले. पण घर बांधण्यापेक्षा गोठा बांधण्याला प्राधान्य दिले.

शेती वाचवायची तर माती आणि देशी गाय महत्त्वाची हे प्रमाण मानले. गीर, कांकरेज, डांगी व साहिवाल आदीं ३४ गायींचे संगोपन सुरू आहे. शेणखत, गोमूत्राचा वापर शेतीत होतो. दुधापासून तूप तयार केले जाते.

-काडीकचरा, पीक अवशेषांचा वापर करून प्रति १० लिटर पाण्यात तीन किलो साखर, उतरलेली पक्व फळे, एक किलो गूळ मिश्रण असे मिश्रण तयार केले जाते. ते ९० दिवस ठेवून द्रावणाचा

पिकांसाठी संजीवक म्हणून वापर.

-जिवामृत, दशपर्णी अर्क, आले-मिरची-लसूण अर्क, नीम व करंज ऑइल, ताक व हळद संयुक्त मिश्रणनिर्मिती.

-जिवामृत निर्मितीसाठी दैनंदिन ८०० लिटर उत्पादन क्षमतेचे चार आधुनिक युनिट्स. बीट, शेवगा पाने यांचाही वापर.

-जमिनीची धूप व बाष्पीभवन रोखण्यासाठी सेंद्रिय आच्छादन

-केंद्रीकृत सेन्सर आधारित ठिबक सिंचन व्यवस्थापन.

-अत्याधुनिक फवारणी यंत्रांचा वापर.

-वीजपुरवठा खंडित झाल्यास आपत्कालीन काळात तीन एचपी क्षमतेचे सौर पंप.

-शेतीमाल प्रतवारीसाठी स्वतंत्र कक्ष.

-शेत परिसराच्या निगराणीसाठी ‘सीसीटीव्ही’.

Organic farming
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

ग्राहकांची थेट बाजारपेठ

केवळ उत्पन्नवाढीपेक्षा ग्राहकांना आरोग्यदायी माल देणे हा उद्देश समोर ठेवला. त्यांच्याकडून व्हॉटस ॲपद्वारे आगाऊ मागणी नोंदविली जाते. मालकाढणीसाठी मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस निश्‍चित केले आहेत. संकलन, गुणवत्ता तपासणी, प्रतवारी करून व मालाची मागणी निश्‍चित करून ग्राहकांना मालाचा थेट पुरवठा होतो.

असे ५० ते ७० कुटुंबांचे नेटवर्क तयार केले आहे. मजुरांच्या मदतीने नाशिक शहरात द्वारका, सिडको, गंगापूर रोड तर दिंडोरी शहर परिसरात सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर पेरू व द्राक्षविक्री होते. सेंद्रिय किंवा रासायनिक अवशेषमुक्त शेतीवर भर दिलेले उत्पादन असल्याने ग्राहकांकडून पसंती असते. ग्राहक ठरलेले असल्याने मागणीएवढेच उत्पादन होण्याच्या दृष्टीने क्षेत्र व पिके निश्‍चित केली जातात.

कुटुंबाची एकी

प्रताप शेतीत रात्रंदिवस राबतात. पत्नी योगिता, भाऊ विलास व वहिनी कविता यांचाही मोठा हातभार लागतो. वीस जणांचे कायमस्वरूपी निवासी मनुष्यबळ आहे. अलीकडेच नेहराई शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे.

प्रताप श्री श्री किसान मंचचे सक्रिय कार्यकर्तेही आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासह संघटित ठेवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. आरोग्यदायी अन्न सेवनातून ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान असावे, त्यासाठी प्रामाणिक काम असणे गरजेचे आहे यावर त्यांची श्रद्धा आहे.

संपर्क : प्रताप बनकर, ९८९००६५६८६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com