MLA Balasaheb Thorat : सत्यजित तांबे यांना काँग्रेसशिवाय करमणार नाही

माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात गेल्या दीड -दोन महिन्यांपासून आजारी असल्याने मुंबईत होते.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratAgrowon

Nagar News : डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी पाच जिल्ह्यांच्या मतदार संघात निर्माण केलेल्या जिव्हाळ्यामुळे सत्यजित तांबेचा विजय झाला. मात्र अपक्ष म्हणून सत्यजितला करमणार नाही आणि आमच्याशिवाय त्याचे काही चालणारही नाही.

त्यामुळे किती दिवस अपक्ष राहतो ते बघू, असे सांगत आपण असतो तर सत्यजितच्या बाबतीत झालेली तांत्रिक चूक टळली असती. आपला विचार काँग्रेसचा विचार आहे.

त्याच विचाराने काम करीत राहणार आहोत, त्यात तडजोड करणार नाही असे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

‘‘अलीकडे आमच्या शेजारच्या मंत्र्यांना आमच्याशिवाय करमत नाही. एखादा दिवस खाडा केला तर मोडशी होईल की काय, अशी त्यांची अवस्था होते,’’ असे म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात गेल्या दीड -दोन महिन्यांपासून आजारी असल्याने मुंबईत होते.

Balasaheb Thorat
Maharashtra Politics : सत्यजित तांबे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात

दरम्यानच्या काळात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. सत्यजित तांबे त्यात विजयी झाले, मात्र त्या काळात अनेक घडामोडी घडल्या, थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

दीड महिन्यानंतर सोमवारी (ता. १३) रात्री थोरात संगमनेरला आल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या वेळी थोरांतानी अनेक बाबींचे स्पष्टीकरण केले. विशेषतः अपक्ष निवडून आलेले भाचे सत्यजित तांबे यांच्याबाबत भाष्य केले.

मी अधिक बोलणार नाही ः सत्यजित तांबे

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, ‘‘मी अपक्ष असल्याने राजकारणावर जास्त बोलणार नाही. बाळासाहेब थोरात व सत्यजितला अडचणीत आणण्याचे, आमच्या कुटुंबात भांडणे लावण्याचे काम काहींनी केले. पण त्यांचे डाव हाणून पाडले.

विचारांची लढाई विचारांनी लढलो. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांच्यावर विश्‍वास ठेवून जनतेने मला काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com