paddy cultivation: ओडिशातील भात लागवडीत २० टक्क्यांची घट

ओडिशात पारंपारिक पद्धतीने भात लागवड (Paddy Cultivation) केली जाते. मागच्या वर्षी १ ऑगस्टपर्यंत राज्यात २० लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

जून आणि जुलैदरम्यान पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे ओडिशातील खरीप (kharif season) पेरण्या रेंगाळल्या आहेत. उशिराने झालेल्या पेरण्यामुळे राज्यातील भात लागवडीत २० टक्क्यांची घट झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ओडिशात पारंपारिक पद्धतीने भात लागवड (Paddy Cultivation) केली जाते. मागच्या वर्षी १ ऑगस्टपर्यंत राज्यात २० लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती. यंदा केवळ १६ लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आल्याचे राज्याच्या कृषी संचालनलयाने म्हटले.

मागच्या वर्षी एकूण खरिप हंगामात (kharif season) राज्यभरात ३५ लाखांहून अधिक क्षेत्रात भात लागवड (Paddy Cultivation) करण्यात आली होती. यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे भात लागवडीच्या (Paddy Cultivation) क्षेत्रात घट झाली. उर्वरित काळात लोकांना चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याचेही कृषी विभागाने नमूद केले.

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील भात लागवडीचा वेग मंदावला. जुलै महिन्यात भात लागवडीच्या थोडासा वेग घेतला. आता हवामान खात्याच्या (IMD)अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला तरच भात लागवडीचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे. राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पाऊस झाला. जूनमध्ये राज्यात सरासरी १७३.२ मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा जूनमध्ये केवळ ९८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) जुलै महिन्यात जूनपेक्षा समाधानकारक पाऊस पडला. १ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान राज्यात सरासरी ५८८.३ मिलीमीटर पावसाच्या तुलनेत ५२२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाळयाच्या जून आणि जुलै या सुरुवातीच्या दोन महिन्यात कंधमल आणि बौध या दोनच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. तर भद्रक, मयूरभंज, सुंदरगड, संबळपूर, झारसुगुडा भोलानगीर, कलहंडी या सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील पेरण्यांना गती मिळाली. सुंदरगड, संबळपूर आणि मयूरभंज या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी (Paddy Cultivation)रोपवाटिका तयार करून ठेवल्या. मात्र पुरेसा पाऊसच नसल्याने लागवड पुढे ढकलावी लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या जिल्ह्यांत सिंचनाच्या सुविधा नाहीत, त्यामुळे बहुतांशी ठिकाणची शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.

दरम्यान राज्यातील ७० टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करतात. सिंचनाच्या सुविधा नसल्याने सरासरी पाऊस झाला तरच शेतकऱ्यांना खरीपातील (kharif season) पेरण्या करता येतात. त्यातही बहुतांशी शेतकरी भात लागवडीस पसंती देतात, असे नबनिर्माण कृषक संघटनेचे राज्य समन्वयक अक्षय कुमार यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com