बिबट्यापासून संरक्षणासाठी उभारले माणसासारखे बुजगावणे

भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील राहुल शंकर देसाई या युवकाने आपल्या शेतातील जनावरांच्या वस्तीजवळ बिबट्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी युक्ती शोधून हुबेहूब माणूस उभा केल्यासारखे बुजगावणी तयार केली आहेत.
Scare Crow
Scare CrowAgrowon

मांगले, जि. सांगली : भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील राहुल शंकर देसाई (Rahul Desai) या युवकाने आपल्या शेतातील जनावरांच्या वस्तीजवळ बिबट्यापासून जनावरांचे (Leopard Attack) संरक्षण करण्यासाठी युक्ती शोधून हुबेहूब माणूस उभा केल्यासारखे बुजगावणी (Scare Crow Like Human) तयार केली आहेत. राहुल यांचे राहते घरही शेतातच आहे. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डोंगराच्या शेजारी असणारी वस्ती जनावरांची वस्ती आणि राहते घर या या माणसासारख्या दिसणाऱ्या पुतळ्यांच्या संरक्षणात आहेत.

Scare Crow
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

पाच महिन्यांपूर्वी शिंगटेवाडी ते भाटशिरगावच्या मध्यावर असणाऱ्या एका वस्तीवरील लहान रेडकांच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. याचवेळी प्रयोग म्हणून राहुल यांनी शेतातील आपल्या घरातील आई, वडील आणि जनावरांच्या संरक्षणासाठी चार बुजगावणी उभी केली होती. यापैकी राहत्या घराजवळ एक आणि जनावरांच्या छपराजवळ एक अशी बुजगावणी उभा केली. मांगले - कांदे आणि भाटशिरगावच्या मध्यावर असणाऱ्या बांबर डोंगराच्या उत्तरेला राहुल देसाई यांच्या राहत्या घरासह अन्य पंधरा ते वीस शेतकऱ्यांची शेतात राहती घरे व जनावरे आहेत.

Scare Crow
युवकांच्या संतापापुढे केंद्राचे डॅमेज कंट्रोल: गृह, संरक्षण मंत्रालयात अग्निविरांना आरक्षण

बारावी नंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्याच्या खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या राहुल यांनी शेतात राहणाऱ्या कुटुंबीयांची आणि जनावरांची काळजी म्हणून काम करीत असलेल्या कंपनीत वापरातील चांगले कपडे आणून त्याचे माणसासारखे दिसणारी बुजगावणी तयार करून बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रात बिबट्या फिरकणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात उन्हाळ्यात त्यांच्या वडिलांनी जनावरांना मोकळ्या छपरात बांधून सुद्धा बिबट्या या छपराच्या आजूबाजूलाही आलेला नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही राहुल यांनी केलेल्या प्रयोगाची माहिती घेतल्यानंतर कौतुक केले. या परिसरात रस्त्यावरून जाणारे प्रवासी हमखास थांबून बघत राहतात.

शेतात वस्ती आणि राहते घर आहे. गावाच्या पूर्वेला सगळ्यात शेवटी आमचे घर आहे. घरात आई, वडील दोघेच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे कुटुंबीयांचे आणि जनावरांचे संरक्षण व्हावे म्हणून बुजगावणी उभी करण्याची युक्ती शोधली. प्रयोग म्हणून केलेली युक्ती यशस्वी झाल्यामुळे मी पुण्यात आता निर्धास्त नोकरीला जात आहे.
राहुल देसाई, भाटशिरगाव, ता. शिराळा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com