Forest Fire : वन कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

वाढत्या उष्णतेमुळे वणवा लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग तालुक्यात १५ दिवसांपासून वणवा लागल्यास सुरुवात झाली आहे.
Forest Fire
Forest Fire Agrowon

Alibag News : तालुक्यात वणव्याचे (Forest Fire) प्रमाण वाढत आहे. हे वणवे विझवण्यासाठी वनपाल, वन रक्षक व वनमजूर (Forest Labor) मेहनत घेत असतात; परंतु अपुऱ्या सुविधांमुळे वन कर्मचाऱ्यांची (Forest Officers) सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांना मास्क व इतर सुविधा नसल्याने आग विझवताना जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काहींना दुखापतही होत असल्याचे वन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

वाढत्या उष्णतेमुळे वणवा लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग तालुक्यात १५ दिवसांपासून वणवा लागल्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील सात ठिकाणी आतापर्यंत वणवे लागले आहेत. काही जण वन्य प्राण्यांना मारण्यासाठी आग लावतात.

Forest Fire
Forest Conservation : वनसंवर्धनातून बदलले चिमणपाड्याचे रुपडे

तर काही ठिकाणी सिगारेट, विडीमुळे आग लागत असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तालुक्यात वणव्यांमुळे शेकडो एकर क्षेत्र आगीच्या विळख्यात सापडत आहे. त्याचा परिणाम दिवसेंदिवस धूर प्रदूषण वाढण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे.

धुरामुळे मानवी आरोग्यासह जंगलातील पशूपक्ष्यांवर होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

वणव्यांना आटोक्यात आणण्यासाठी वनपाल, वनरक्षक, वनमजूर जीवाची बाजी लावत आहेत. जंगलात फिरताना कर्मचाऱ्यांकडे काठी नसते.

आग लागल्यावर धुराचा विळखा परिसरात निर्माण होतो. या धुराचा त्रासामुळे अनेक वेळा कर्मचाऱ्यांना चक्कर आली आहे. काही कर्मचारी जखमीही झाले आहेत. डोंगर भागात आग विझवताना तारेवरची कसरत करावी लागते.

अनेकांना फायर ब्लोअर मशीन हाताळता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी शूज, बॅटरी, जॅकेट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे, असा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांची सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Forest Fire
Forest Fire : वणव्यात होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू
वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शूज व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना आग विझवताना कोणतीही इजा होऊ नये, याबाबतही काळजी घेतली जात आहे.
नरेंद्र पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com