नेहमीच भाऊ, तुमची घाई, नका करू गडबड पेरणीला

बीज प्रक्रियेवरील लावणीचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Sowing
SowingAgrowon

कोल्हापूर : बळीराजाला दिलासा देण्यासाठी सहायक कृषी अधिकारी फेसबुक पेजच्या वतीने तयार केलेल्या बीज प्रक्रियेवर (Seed Processing) आधारित ‘लावणी बीज प्रक्रियेची’ (Viral Lavani Song) सध्या सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. ‘पेरणीची घाई करू नका, प्रथम बीजप्रक्रिया करा’ असा संदेश त्यातून देण्यात आला आहे.

औरंगाबादचे कृषी सहायक शिवानंद आडे यांनी लिहिलेले गीत व तिथल्याच कृषी सहायक अनिता बनकर (Anita Bankar) यांचा आवाज शिवारातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर घुमत आहे. ‘तिफन फाउंडेशन’संचलित सहायक कृषी अधिकारी परिवाराने हा व्हिडिओ तयार केला आहे.

पाऊस पाहूनच पेरणी करा, पण त्यापूर्वी बीजप्रक्रिया काटेकोरपणे करा, असा सल्ला लावणीतून देण्यात आला आहे. राज्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेला हा हटके प्रयोग चर्चेचा ठरला आहे.

ढोलकीचा ठेका सुरू होतो आणि प्रत्येक पिकाची बीजप्रक्रिया कशी करावी, याच्या स्लाइड्स सुरू होतात. प्रत्येक कडव्यात प्रत्येक पिकाच्या बियाण्यांवर कशी बीजप्रक्रिया करावी, असे सुरातून सांगत गायिका बनकर यांनी शेतकऱ्यांना खिळवून ठेवले आहे.

लावणीची व्हिडिओ निर्मिती संस्थेचे सहसंस्थापक प्रदीप भोर यांनी केली. संतोष पाटील (कोल्हापूर), यशवंत गव्हाणे (सिंधुदुर्ग), अनंत देशमुख (अकोला), मनोज गायधने (वर्धा), अंजना सोनवलकर (जालना), भुजंग लोकरे (उस्मानाबाद), शरद नीलकंठवार (नांदेड), अमोल हिसेकर (वाशीम), विठ्ठल धांडे (बुलडाणा), समाधान चौधरी (जळगाव) आदींनी मेहनत घेतली. संस्थेच्या सदस्य सीमा आंबोरे यांनी लोककलाकारां मदतीने व्हिडिओ तयार केला.

सोशल मीडियाद्वारे तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना मिळावी, हा उद्देश होता. शेतकऱ्यांना माहिती देण्याचा हेतूही यातून साध्य झाला आहे.

-अनिता बनकर, गायिका, कृषी सहायक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com