
Parbhani Irrigation News : जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये माथा ते पायथा उपाययोजना अंतर्गत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत अशी माहिती जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.
पावसाची अनियमितता, खंड यामुळे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता विचारात घेऊन तसेच टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी तत्कालीन युती सरकारने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी मोहीम सुरु केली होती.
या अंतर्गत पहिल्या टप्पा २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत राबविण्यात आला.परभणी जिल्ह्यात २०१५-१६ यावर्षी १७० गावे, २०१६-१७ मध्ये १६० गावे,२०१७-१८ मध्ये १२८,तर २०१८ -१९ मध्ये १२४गावांची निवड करण्यात आली होती. राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गतच्या निकषानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जातील. शिवार फेरीद्वारे जलसंधारणाच्या कामांची ठिकाणे निश्चित केली जातील.
मुलस्थांनी जलसंधारणा अंतर्गत ढाळीचे बांध, खोल सलग समतळ, माती नाला बांध, अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे, दगडी बांध, शेततळे, वनतळे, खोदतळे, सिमेंट नाला बंधारे, कोल्हापुरी बंधारे, विहिर फेरभरण, बंधारे, तवालातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला जोड प्रकल्प आदी कामे प्रस्तावित आहेत.
पाण्याच्या ताळेबंधाद्वारे गावासाठी उपलब्ध होणारे पाणी व वापरात येणारे पाणी याचा लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडण्यात येईल. पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी जलसाक्षरता वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये निवड झालेली गावे
परभणी तालुका : जवळा, टाकळगव्हाण, डफवाडी, दामपुरी, धोंडी, पाथरा, पिंपळगांव ठोंबरे, सहजपूर, नांदगाव बुद्रुक, देवठाणा. (१० गावे)
जिंतुर तालुका : जवळा खु, टाकळखोपा, डोहरा, नांदगाव दुधना, पोखर्णी तांडा, भांबरी, माक, मोहखेडा तांडा, वझर बुद्रुक, शेक, सोरजा, कोलपा, डोंगरतळा, घेवडा, खरदडी, आंगलगांव, भोसी, सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, किन्ही, केहाळ, मानकेश्वर (काकडे), सावळी बुद्रुक, घडोळी, खोलगाडगा, निलज. (२६ गावे)
सेलू तालुका : करडगाव, खुपसा, शिराळा, शेलवाडी, गोमेवाकडी, धनेगाव, निपाणी टाकळी, बोरगाव जहांगीर. (८ गावे)
मानवत तालुका : लोहरा, सावंगी मगर. (२ गावे)
पाथरी तालुका : गुंज खुर्द, माळीवाडा, सिमूरगव्हाण. (३ गावे)
सोनपेठ तालुका : उखळी बुद्रुक, खपाटपिंपरी, धारडिघोळ, भाऊचातांडा, मरगळवाडी, मुंशीराम तांडा. (६ गावे)
गंगाखेड तालुका : कड्याचीवाडी, मानकादेवी, हनुमाननगर, विठ्ठलवाडी, शेंडगा, बोथीतांडा, घटांग्रा, घटांग्रातांडा, बेलवाडी, पांगरी, टाकळवाडी, राणीसावरगांव, फुगनरवाडी, कांगणेवाडी, दामपुरी, दगडवाडी, बनपिंपळा, पडेगाव, शंकरवाडी, आनंदवाडी. (२० गावे)
पालम तालुका : आडगाव, गणेशवाडी, घोडा, जवळा पालम, तेलजापूर, बरबडी, रामापूरतांडा, राहाटी, सातेगांव, खरब धानोरा. (१० गावे)
पूर्णा तालुका : आवई इटलापूर माळी, महातपूरी, रामापूर, सोन्ना तर्फे कावलगाव, एकरुखा. (६ गावे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.