निःस्वार्थी नातं मैत्रीचं

निःस्वार्थ भावनेने आपल्याला जिवापाड जपणाऱ्‍या आपल्या मैत्रिणी, आपले मित्र यांना आपण वेळ देत नाही. एक मित्र दुसऱ्‍या मित्रासाठी खूप मोठा आधार असतो. कारण त्याने हाक दिल्यावर त्या हाकेला साद तो मित्र तितक्याच उत्साहाने देत असतो.
Friendship
FriendshipAgrowon

ज्योती आधाट/तुपे

आपण आहे तोवर हेवे दावे करून, राग मनात धरून, वैरभावनेने जगतो. ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांना क्षमा करत नाही. आणि क्षमा न केल्यामुळे आपलं मन सतत दुःखी, व्याकूळ अवस्थेत असत. काही दिवसांपूर्वी असेच वडिलांच्या वयाचे एक गृहस्थ भेटले आणि म्हणाले ताई माझा मित्र माझ्याशी बोलत नाही. विशेष असं काही घडलं नाही पण तो का बोलत नाही याचे कारणही कळेना. त्याच्या न बोलण्याने माझं मन खूप निराश आहे.

Friendship
Soybean : अमेरिकेत सोयाबीन दर स्थिरावले

त्यांचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि म्हटलं, काका एक दिवस जरूर तुमचा मित्र तुमच्याशी बोलेल. त्याच्या मनातील गैरसमज दूर होतील. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्याला क्षमा करा आणि आनंदी राहा. या वयात तुम्हाला आवडतील अशा पुस्तकांचे वाचन करा. या उदाहरणाप्रमाणे आपलेही एखाद्या व्यक्तीशी बिनसलेले असते अन् मग आपण अबोला धरतो. पण या अबोल्यामुळे दोघांच्याही मनाची अवस्था खूप दुःखी असते. स्वतःहून माफी मागण्यात अथवा माफ करण्यात काहीच कमीपणा नसतो. आपल्याला माहीत नाही आपलं आयुष्य हे किती आहे. आहे तोवर मन न दुखावता आनंदानं जगणं इतकं कठीण आहे का? गेल्यावर मग आठवणी काढून आपण धो-धो रडतो. कधी कधी प्रश्‍न पडतो. ते रडणं खरंच आतून आलेलं असतं, की दाखवण्यापुरतं नाटकी असतं. आजकाल ड्रामा जास्त पाहायला, अनुभवायला मिळतो. याचे एकमेव कारण म्हणजे मोबाईलच्या दुनियेत आपण नात्यांना फारसं महत्त्व देत नाही.

आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्‍यांसाठी नक्की वेळ काढा. त्यातून आनंदच मिळेल.निःस्वार्थ भावनेने आपल्याला जिवापाड जपणाऱ्‍या आपल्या मैत्रिणी, आपले मित्र यांना आपण वेळ देत नाही. एक मित्र दुसऱ्‍या मित्रासाठी खूप मोठा आधार असतो. कारण त्याने हाक दिल्यावर त्या हाकेला साद तो मित्र तितक्याच उत्साहाने देत असतो. मित्रांमधलं नातं हे निःस्वार्थी असतं. त्यामुळे या नात्यात आनंद मिळतो. सच्चा मित्र भेटायला ही आपल्याला तसं वागावं लागतं. उगीचच कुणीही कुणाशी चांगलं वागत नाही. दोन मैत्रिणी जेव्हा एकमेकींजवळ मनमोकळं करतात. मनसोक्त हसतात, गप्पा मारतात. कधी कधी रडतातही. त्यानंतरची त्यांची एनर्जी लेव्हल वाढलेली असते. मैत्रीला वयाचं बंधन नसतंच मुळी. ती कोणत्याही वयात आणि कुणाबरोबरही होऊ शकते. अगदी ६-७ वर्षांचे मूल आणि वृद्ध व्यक्ती यांचीही निरागस मैत्री होऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com