Pomegranate Processing Industry : ज्वारी, डाळिंबाच्या प्रक्रिया उद्योगासाठी क्लस्टर उभारू

Pomegranate Production : मंगळवेढा तालुक्यात ज्वारीचे, तसेच परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे.
Minister Narayan Rane
Minister Narayan RaneAgrowon

Solapur News : मंगळवेढा तालुक्यात ज्वारीचे, तसेच परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. लघुउद्योग मंत्रालयाच्या वतीने ज्वारी आणि डाळिंबाच्या प्रक्रिया उद्योगासाठी मंगळवेढ्यात स्वतंत्र क्लस्टर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन केंद्रीय सूक्ष्म लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी गुरुवारी (ता. ४) मंगळवेढ्यात दिले.

दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कृषी उद्योजक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम, सचिव प्रियदर्शनी कदम -महाडीक, प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रणव परिचारक, दीपक चंदनशिवे आदी उपस्थित होते.

Minister Narayan Rane
Sugar Price : साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्यासाठी पंतप्रधानांना पत्र

मंत्री राणे म्हणाले, की राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यात आहेत. तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे. यासाठी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन उत्पादन वाढवावे. जेणेकरून बेरोजगार तरुणांना छोट्या उद्योगाबरोबरच, नोकऱ्या उपलब्ध होऊन त्यांचे दरडोई उत्पन्न वाढेल व जीवनमान उंचावेल.

केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागामार्फत देशात विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योग व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याचे व देशाचे उत्पन्न वाढवावे आणि देशाला आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंगळवेढ्याच्या ज्वारीला जी. आय. मानांकन असून, येथील ज्वारीला विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ज्वारीला मागणी असून, ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी क्लस्टर निर्माण करण्याची मागणी संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी कदम-महाडीक यांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिराम सराफ यांनी केले. या कार्यक्रमाला मंगळवेढ्यासह परिसरातून शेतकरी आणि उद्योजक उपस्थित होते.

महिला, तरुणांना उद्योगात संधी

केंद्रीय उद्योग विभागामार्फत सूक्ष्म विभागातील उद्योगांसाठी एक कोटीची, लघू विभागातील उद्योगांमध्ये ५० कोटीची आणि मध्यम विभागातील उद्योगांसाठी २५० कोटी रुपयांची मर्यादा आहे आणि त्यावर सबसिडीही मोठ्या प्रमाणात आहे. या योजनांचा तरुणांनी व महिलांनी लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी या वेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com