Fire News : खेडलेझुंगेत आगीत सात जनावरे होरपळली

घरासमोरच जनावरांचा गोठा होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुटुंबियांना आग लागल्याचे उशिरा लक्षात आले.
Nashik Fire New
Nashik Fire NewAgrowon

Nashik Fire News : अस्मानी अन्‌ सुलतानी संकटामधून वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका संपता संपेना. उन्हाळ्यामध्ये जनवारांना चारा मिळावा म्हणून सोयाबीन (Soybean) , मका चऱ्याची कुटी (भुसा) साठवून ठेवलेला होता. त्याला मध्यरात्री आग लागल्याने सर्व नष्ट होऊन चाऱ्याचा (Fodder) प्रश्‍न निर्माण झाला आहे.

खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे भर वस्तीत असलेल्या कैलास माधव घोटेकर यांच्या मालकीच्या गट नंबर ४५२-अ मध्ये राहते घर आणि जनवारांचा गोठा आहे.

त्यांनी पशुधनासाठी साठवून ठेवलेल्या भुशाच्या छपराला व गायीच्या गोठ्याला मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजेच्या सुमारास आग लागून अंदाजे २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत राहत्या घरासमोरील गोठ्यात १ गाय, ५ म्हशी आणि १ पारडी आगीच्या वाफेने भाजल्या आहेत.

Nashik Fire New
Cotton : या कापसापासून बनवलेल्या कापडाला आग लागत नाही

घरासमोरच जनावरांचा गोठा होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुटुंबियांना आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. आगीच्या वाफेमुळे जनावरांनी मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा सुरु केला होता.

या आवाजाने घोटेकर व परिसरातील कुटुंबीय जागे होऊन गोठ्याकडे धावले असता, गोठ्यातून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे विदारक चित्र बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

भुसाऱ्याची आग असल्याने आग विझविण्यासाठी मोठा कालावधी गेला. दरम्यान, माहिती मिळताच देवगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. जी. शीसोदे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले.

भाजलेल्या जनावरांची तपासणी करून ते ३० ते ४० टक्के भाजल्याचे डॉ. शिसोदे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी वेदनाशामक प्रतिजैविके, व्हिटॅमिन्सचे इंजेक्शन आणि सलाईन देऊन, जखमेवर शाई व मलम लावून उपचार केले. शासन स्तरावरून पंचनामा होऊन मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Nashik Fire New
Crop Damage : विजेची तार तुटल्याने १५ एकर उसाला आग

आग आटोक्यात आणण्यासाठी ज्ञानेश्‍वर गिते, प्रमोद गिते, साईल घोटेकर, कैलास साबळे, सावळीराम गिते, विलास घोटेकर, ऋषिकेश घोटेकर, कृष्णा घोटेकर, अनिमेश साबळे, सार्थक साबळे, गणेश गिते यांनी अथक परिश्रम घेतले.

पशुधन मोठ्या प्रमाणावर आगीच्या वाफेमुळे भाजली आहेत. ती पूर्ण बरी होण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. जखमा खोलवर नसल्याने पशुधन दगवण्याची शक्यता खूपच कमी आहे.
डॉ. एम. जी. शिसोदे, पशुधन विकास अधिकारी, देवगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com