Akola News : अकोल्यातील पारस येथे टिनशेडखाली दबून सात भाविकांचा मृत्यू

पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात कार्यक्रम सुरू असताना भाविक जमलेले होते. यावेळी वादळ आल्याने मंदिराशेजारी असलेले १०० वर्षे जुने कडूलिंबाचे झाड कोसळले.
Akola News
Akola NewsAgrowon

Akola News : बाळापूर तालुक्यातील पारस येथे रविवारी (ता. ९) रात्री बाबूजी महाराज मंदिरात महाआरती सुरू असताना टिनशेडवर १०० वर्षे जुने कडूलिंबाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे सात जणांचा मृत्यू झाला.

तर, २३ व्यक्ती जखमी झाल्या असून त्यापैकी पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मंदिरात महाआरती होत असतानाच आलेल्या वादळामुळे हे झाड कोसळून त्याखाली ५० पेक्षा अधिक जण दबले होते.

पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात कार्यक्रम सुरू असताना भाविक जमलेले होते. यावेळी वादळ आल्याने मंदिराशेजारी असलेले १०० वर्षे जुने कडूलिंबाचे झाड कोसळले.

यामुळे एकच हाहाकार उडाला. या टिनशेडखाली ४० ते ५० जण अडकले होते. या घटनेनंतर एकच पळापळ झाली. यातील सात जणांचा मृत्यू झाला.

Akola News
Agriculture Department Akola : अकोला कृषी विभागास मिळाले विभागप्रमुख

या मृतांमध्ये उमा महेंद्र खारोडे (वय ५०, रा. फेकरी, दीपनगर, ता. भुसावळ, जि. जळगाव), पार्वती महादेव सुशीर (वय ५५, रा. भालेगाव बाजार, ता. खामगाव, जि. बुलडाणा), अतुल श्रीराम आसरे (वय ३५, रा. बाभूळगाव, जि. अकोला), मुरलीधर अंबारखाने (वय ५५, रा. पारस, जि. अकोला), भास्कर अंबुलकर (वय ५५ वर्षे (शिवसेना वसाहत, अकोला) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

जखमींना तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार दिले जात असून पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधत तातडीने उपाययोजनांचे निर्देश दिले.

यामुळे विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देत पाहणी केली. जिल्हा रुग्णालयात त्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जखमींची विचारपूस केली. आमदार रणधीर सावरकर यांनीही यावेळी जखमींची विचारपूस करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com