Shahpur News : शहापूर-धेरंडला उधाणाचा वेढा

तालुक्यातील शहापूर, धेरंड या दोन गावातील जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे.
Shahpur News
Shahpur NewsAgrowon

Alibag News : तालुक्यातील शहापूर, धेरंड ही गावे उधाणाच्या पाण्याने वेढली आहेत. तीन दिवसांपासून उधाणाचे पाणी गावात घुसल्याने २३ घरांचे नुकसान झाले आहे. पण कोणतीही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नसल्याने संतापाची भावना आहे.

तालुक्यातील शहापूर, धेरंड या दोन गावातील जमीन एमआयडीसीने संपादित (Land Acquisition) केलेली आहे. मात्र, खाडी किनाऱ्यावरील बांधबंधिस्तीची डागडुजी होत नसल्याने उधाणाचे पाणी सातत्याने गावामध्ये शिरत आहे.

Shahpur News
Nature Photography : समुद्र किनाऱ्यांवरची सफर

एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. या उधाणाची माहिती मिळताच पंडित पाटील यांनी तातडीने धेरंड, शहापूरचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येवरून खो-खो खेळत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच कायमस्वरुपी बंधाऱ्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर असताना खालच्या यंत्रणेने वेळ न दवडता पावसाळ्यापूर्वी बंधारा बांधणे गरजेचे असल्याची मागणी देखील केली.

Shahpur News
Millet Production : शहापूर तालुक्यात वरई उत्पादन घटले
या समस्येवर सरकारने आता कायमस्वरूपी तोडगा काढावा. पावसाळ्यापूर्वी जर बंधारा बांधला नाही तर येथील रहिवाशांचे कायमस्वरुपी स्थलांतर करावे लागेल. तसेच चालढकल न करता पावसाळ्यापूर्वी या समस्येवर तोडगा काढावा.
पंडित पाटील, माजी आमदार, शेकाप

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com