Kolhapur APMC Election Update : शाहू शेतकरी पॅनलचे जयसिंगपूर बाजार समितीवर सत्ता

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सर्व १८ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला.
Kolhapur Apmc Election
Kolhapur Apmc ElectionAgrowon

Kolhapur Election Update : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सर्व १८ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला. यातील सात जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. निकालानंतर विजयी उमेदवार आणि समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मोट बांधून राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अनिलराव यादव, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी ही निवडणूक बिनविरोधसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केला.

Kolhapur Apmc Election
Apmc Election Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चारही बाजार समित्यांवर भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व

सात जागाही बिनविरोध केल्या. मात्र, भाजपचे तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी आघाडीने आम्हाला जागा न दिल्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ११ जागांसाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

रविवारी (ता. ३०) मतदान झाल्यावर सायंकाळी शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत १० टेबलवर मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यां‍नी निवडणुकीचे काम पाहिले.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

सोसायटी गट - दीपाली चौगुले (उदगाव), माधुरी सावगावे (कुरुंदवाड), ग्रामपंचायत अनुसूचित जाती - सिद्राम कांबळे (नांदणी), ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल ः किरण गुरव (टाकवडे), व्यापारी व आडते गट - प्रवीणकुमार बलदवा व दादासो ऐनापुरे (जयसिंगपूर), हमाल व तोलाई गट - भगवान पाटील (जयसिंगपूर).

Kolhapur Apmc Election
Alibaug APMC Election : अलिबागमध्‍ये महाविकास आघाडीचा डंका

विजयी उमेदवारांना मिळालेली मते

सोसायटी सर्वसाधारण गट : सुरेश माणगावे - दानोळी (१४३४), रामदास गावडे - शिरोळ (१४७४), मुजम्मिल पठाण - आलास (१४१७), विजयसिंह देशमुख - शिरोळ (१४४४), सुभाषसिंग रजपूत - मौजे आगर (१३६३), महावीर पाटील - हसूर (१४०२), शिवाजी चव्हाण - शिरोळ (२४४०), सोसायटी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी सोसायटी गट : दऱ्या‍प्पा सुतार - दत्तवाड (१४४०), भटक्या जाती व जमाती : चंद्रकांत जोंग - कुरुंदवाड (१४८३), ग्रामपंचायत सर्वसाधारण गट : अण्णासो पाणदारे - अकिवाट (५००), संजय अणुसे - तेरवाड (५४६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com