
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशराव धोंडगे (Keshavrao Dhondge) यांचे रविवारी (ता.१) वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद (Aurangabad) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मराठवाड्यातील शेकाप पक्षाची (Shetkari Kamgar Paksh) मुलुखमैदानी तोफ अशी केशवराव धोंडगे यांची ओळख होती. त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवायजी हायस्कूल पानभोसी कंधार येथे ठेवण्यात आला आहे. कंधार येथील क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे ४.१५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
केशवराव धोंडगे अखेरच्या श्वासापर्यंत शेकाप पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांची राजकीय कारकीर्दही विशेष गाजली. विधिमंडळ असो वा जाहीर सभा धोंडगे यांच्या भाषणांतील धारदारपणाने अनेकांची धांदल उडायची. एकवेळ खासदार आणि पाचवेळा आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. १९६७ ते १९९५ काळात ते नांदेड जिल्ह्यातील कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिले. तसेच १९७७ ते ८० च्या दरम्यान त्यांनी नांदेड जिल्ह्याचे खासदारही होते.
त्यांचा जन्म कंधार तालुक्यातील गऊळ येथे झाला. कायम दबलेल्या समाजाचे प्रश्न त्यांनी आग्रहीपणे मांडले. प्रसंगी सत्ताधाऱ्यांना जाबही विचारला.
स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, सीमाप्रश्न आणि आणीबाणीच्या विरोधात त्यांणी लढा दिला. आणीबाणीच्या काळात त्यांना १४ महीने तुरुंगावास झाला. पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचराऊ सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह अशी नावे देऊन सत्याग्रह केले.
शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरआणि गरिबांच्या मुलांसाठी धोंडगे यांनी ५७ शाळा, एक लॉ कॉलेज आणि दोन महाविद्यालय स्थापन केले. १९४९ साली कंधार येथे त्यांनी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटीचे स्थापना केली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.