
Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Sangli Agriculture Produce Market Committee) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे व विशाल पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून शिवसेनेला सहा जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी ठेवला आहे.
बाजार समितीसाठी महाविकास आघाडी होणार की स्थानिक पातळीवर पॅनेल होणार, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका होत आहेत. आघाडी होणार, याची खात्री झाल्याने शिवसेना नेत्यांनी आघाडीमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
सेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे व युवा नेते विशाल पाटील यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये जिल्हा बँकेत तासभर चर्चा झाली.
जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले, की बाजार समितीला महाविकास आघाडी होणार आहे. राज्यातील पॅटर्न या निवडणुकीत केला तरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वेगळा मेसेज जाणार असून याचा फायदा आघाडीला होणार असल्याने बाजार समितीमध्ये आघाडी करण्यावर तिन्ही पक्षांचे जिल्ह्यातील नेते सकरात्मक आहेत.
या आघाडीत शिवसेनेलाही चांगले स्थान मिळावे, यासाठी नेत्यांबरोबर चर्चा केली जात आहे. पक्षाची तिन्ही तालुक्यात चांगली ताकद असल्याने प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे सहा जागांची मागणी करण्यात आली आहे.
भाजप-शिवसेना युतीचे पॅनेल लढणार
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युती एकसंघपणे लढेल. सातही बाजार समित्यांत स्वतंत्र पॅनेल करून आम्ही ताकदीने मैदानात उतरत आहेत.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजप युतीचे स्वतंत्र पॅनेल उतरवत आहेत. त्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा झाली आहे. सांगली बाजार समितीबाबत खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी ताकदीने उतरू.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.