अवसरी बुद्रुकच्या शिवसेना कार्यकर्त्यांचे मंचरला उपोषण

तलाठी कार्यालय पाडल्यासंबंधी कारवाईची मागणी
Hunger Strike
Hunger StrikeAgrowon

मंचर, जि. पुणे ः अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे ३७ वर्षे जुनी असलेली कामगार तलाठी कार्यालयाची इमारत शासनाची परवानगी न घेता दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी पाडून टाकली. या बाबत तक्रार करूनही संबंधिताच्या विरोधात महसूल खात्याने कोणतीही कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.१९) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले.

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व अवसरी बुद्रूक ग्रामपंचायतीचे सदस्य अजित चव्हाण, स्वप्नील हिंगे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कल्याण हिंगे, बबन हिंगे, चंद्रकांत हिंगे, जयसिंग हिंगे, मच्छिंद्र टाव्हरे, भाजपचे अध्यक्ष संतोष हिंगे, भाजप नेते गुलाब हिंगे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते.

दरम्यान, आंबेगाव तालुका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवसेना नेते राजाराम बाणखेले, पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, शिवाजी राजगुरू, दत्ता गांजाळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

तहसीलदार रमा जोशी व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या तालुका सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जोशी यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत दिले. तूर्तास उपोषण मागे घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com