
Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर कॉँग्रेस अंतर्गत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातं होतं. परंतु आता सिद्धरमाया यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम करण्यात आल्याची घोषणा के सी वेणुगोपाल यांनी केली आहे.
तर कर्नाटक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे डी के शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात येणार असल्याचे वेणुगोपाल यांनी जाहीर केले.
सिद्धारमया मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० मे रोजी शपथ विधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी विरोधीपक्षातील नेत्यांनाही कॉँग्रेसकडून आमंत्रण देण्यात आले आहे.
शनिवारी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यामध्ये कॉँग्रेसने १३५ जागा मिळवत भाजपला दणका दिला. कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
त्यावरून कॉँग्रेसमध्ये सिद्धारमया आणि डीके यांची प्रमुख दोन गट पडल्याचे बोलले जात होते. परंतु सिद्धारमाया यांच्या नाव अंतिम करून अशा प्रकारच्या चर्चेला कॉँग्रेसने महासचिवांनी ब्रेक लावला आहे.
कर्नाटक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. डी के यांच्या समर्थकांनी देखील तशी मागणी लावून धरली होती. परंतु शेवटी कॉँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सिद्धारमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.