वीजनिर्मिती, निर्यातीत ‘सिद्धेश्‍वर’ राज्यात प्रथम

कुमठे येथील‎ श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने‎ २०२१-२२ या गळीत हंगामात १३ लाख २४‎ हजार ७५८ मेट्रिक टन ऊस गाळपाचा‎ उच्चांक केला.
वीजनिर्मिती, निर्यातीत ‘सिद्धेश्‍वर’ राज्यात प्रथम
ElectricityAgrowon

सोलापूर ः ‘‘कुमठे येथील‎ श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर (Sidhheshwar Sugar) कारखान्याने‎ २०२१-२२ या गळीत हंगामात १३ लाख २४‎ हजार ७५८ मेट्रिक टन ऊस गाळपाचा (Sugarcane Crushing)‎ उच्चांक केला. तसेच सहवीजनिर्मितीतून‎ (Power Generation) सर्वाधिक विजेची निर्मिती व सर्वाधिक युनिट‎ वीज निर्यात (Electricity Export) करणाऱ्या सहकारी साखर‎ कारखानदारीमध्ये प्रथम क्रमांक‎ पटकाविला,’’ अशी माहिती कारखान्याचे‎ मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी‎ दिली.‎

काडादी म्हणाले, ‘‘यंदा कारखान्याचा हंगाम सुमारे २१० दिवस चालला. सरासरी साखर उतारा ९.९५ टक्के‎ मिळाला आहे. कच्ची व पांढरी साखर मिळून ८ लाख‎ ४० हजार ७३२ क्विंटल साखर निर्यात‎ करण्यात आली. ८१ हजार १६० मेट्रिक टन‎ बी. हेवी मोलॅसिसचे उत्पादन घेतले.‎ गाळपात राज्यात १० वा आणि जिल्ह्यात‎ दुसऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून १६ कोटी‎ ४० लाख युनिट विजेचे उत्पादन झाले.‎ त्यापैकी १२ कोटी १ लाख २६ हजार ३००‎ युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण‎ कंपनीला दिली. यात कारखाना राज्यात‎ प्रथम क्रमांकावर आला.’’‎

‘‘बी. हेवी मोलॅसिसच्या माध्यमातून २५‎ हजार ५५० मेट्रिक टन मळीचा वापर करून‎ ७५ लाख लिटर मद्यार्कची (स्पिरीट)‎ निर्मिती केली. त्याचा प्रतिटन उतारा २९८‎ लिटर इतका मिळाला आहे.‎ २०२१-२२ हंगाम सुरू करताना शेतकऱ्यांच्या‎ उसाला २५०० रुपये प्रति मेट्रिक टन दर जाहीर‎ केला होता. त्यापैकी ७०-३० या‎ टक्केवारीप्रमाणे १८०० रुपयांचा हप्ता देण्यात‎ आला. उर्वरित रक्कमही लवकरच दोन‎ हप्त्यांत देण्यात येईल. कागद प्रकल्पातून‎ १ एप्रिल २०२१ पासून आजअखेर ३५३३ मेट्रिक‎ टन कागदाचे उत्पादन केले. शिल्लक‎ कागदासह ३५९९ मेट्रिक टन कागद विकले,’’ अशी माहितीही काडादी यांनी दिली.‎

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com