Silk Industry : शेतकऱ्यांच्या समृद्धीत रेशीम उद्योगाचा महत्त्वाचा वाटा

Silk Farming : कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरद्वारे सोमवारी (ता.१) आयोजित केलेल्या ८६ व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.डी. डेंगळे बोलत होते.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरद्वारे सोमवारी (ता.१) आयोजित केलेल्या ८६ व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.डी. डेंगळे बोलत होते.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रेशीम संचालनालय नागपूर चे उपसंचालक एम. बी. ढवळे, जालना जिल्ह्याचे जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते, प्रगतशील शेतकरी दिपक जोशी यांची उपस्थिती होती.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणीतील रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, प्रगतशील शेतकरी सदाशिव गिते, केव्हिकेचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, प्रा.गीता यादव आदी उपस्थित होते.

श्री. डेंगळे म्हणाले, रेशीम उद्योगांमध्ये तंतोतत नियोजन करणे आवश्यक आहे. उद्योगासाठी शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे विविध योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी वेळेत फायदा करून घ्यावा. यावेळी श्री.ढवळे, श्री.मोहिते, श्री. जोशी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Silk Farming
Silk Industry : पांगरी शिवारातील वादळात रेशीम शेड झाले आडवे

श्री. लटपटे यांनी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की रेशीम उद्योगांमध्ये वातावरणातील घटकांचे नियंत्रण व अभ्यास करून त्यानुसार रेशीम शेती करणे आवश्यक आहे. तुती लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच जमिनीच्या प्रकार व पिकाच्या वाढीनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

पाणी देण्यापूर्वी पाण्यातील क्षार तपासून घ्यावेत. तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीने सरी पद्धतीच्या तुलनेत ४४ टक्के पाण्याची बचत होते. तसेच सेंद्रिय पद्धतीने रेशीम कोष उत्पादन व जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी विविध जैविक स्त्रोतांचा वापर करावा.

वर्षाकाठी अर्धा एकर क्षेत्रात दुसऱ्या वर्षापासून पुढे ८०० ते १२०० अंडीपुंज शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तुती लागवड ज्या जमिनीत केली आहे तिथेच संगोपनगृह असावे.

निवडलेली जमीन वायू प्रदूषण किंवा जलप्रदुषणासून दूर असावी. तुती लागवड धुळीच्या रस्त्यालगत नसावी. तसेच तुती लागवड केलेल्या करावयाच्या शेतात पूर्वी मिरची, तंबाखू किंवा भाजीपाला लागवड केलेली नसावी.

यावेळी श्री. गिते यांनी स्वतःच्या रेशीम शेतीचे अनुभवरूपी मार्गदर्शन केले. डॉ. जिंतूरकर यांनी टंचाईग्रस्त परिस्थितीत चारा व्यवस्थापन व प्रक्रिया या विषयावर तर प्रा. यादव यांनी जमिनीच्या योग्य मशागतीसाठी विविध नवीन यंत्रे या विषयावर तर डॉ.पिसुरे यांनी शेतकऱ्यांसाठी केव्हीकेच्या विविध सुविधा व समाज माध्यमांचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.

या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर झाडे यांनी, तर सूत्रसंचालन व आभार डॉ. बस्वराज पिसुरे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com