
परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ (Mahatma Jotirao Phule Farmers' Debt Relief Scheme-2019 ) अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानास पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. २३) पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत परभणी जिल्ह्यातील १ हजार ४९३ आणि हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १५० लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीनुसार परभणी आणि हिंगोली जिल्ह्यतील १६ हजार ७४२ लाभार्थी शेतकऱ्यांना ४६ कोटी ३९ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जामुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांत घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यत लाभ दिला जात आहे. या तीन वर्षांपकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे, त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जात आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ४८८ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. विशिष्ट क्रमांकासह पहिली आणि दुसरी मिळून एकूण ११ हजार ९५ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. त्यापैकी १० हजार १५७ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतले. १५२ कर्जखात्यांबाबत तक्रारी आहेत. आजवर ८ हजार २५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ कोटी ७२ लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले.
हजार ४८३ शेतकऱ्यांना अनुदान वितरित...
हिंगोली जिल्ह्यातील २५ हजार ७७९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. आजवर विशिष्ट क्रमांकासह एकूण ११ हजार २४२ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. त्यापैकी १० हजार ९४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतले. २२७ खात्यांबाबत तक्रारी आहेत. आजवर एकूण ८ हजार ४८३ शेतकऱ्यांना २० कोटी ६७ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले. विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी तत्काळ जनसुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.