Soil Testing : तोंडापूर ‘केव्हीके’तर्फे माती परिक्षण जनजागृती मोहीम
Hingoli News : तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या माती परिक्षण जनजागृती मोहिमेत हिंगोली जिल्ह्यातील एकूण १९ गावांतील ७७३ शेतकऱ्यांचे माती परीक्षण करण्यात आले अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे (Agriculture Science Center) वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी दिली.
माती परीक्षण ही काळाची आहे. जमिनीचे आरोग्य लक्षात घेऊन व जमिनीचा पोत, रासायनिक खताचा बेसुमार वापर, सेंद्रिय खतांचा अल्प प्रमाणात वापर या सर्व बाबीचा विचार करून कृषी विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यातील विविध गावात माती परिक्षण जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
या मोहिमेमध्ये मृदाशास्त्र विशेषज्ञ साईनाथ खरात, संतोष हानवते सहभागी झाले आहेत. कळमनुरी, तालुक्यातील कांडली, डोंगरकडा, देववाडी, रुद्रवाडी, सिंदगी, हिवरा, वसमत तालुक्यामधील तेलगाव, बोराळा, डोणवाडा, कारंजाळा, खुदनापूर, जूनुना, किन्होळा, परळी, भेंडेगाव, चोंडी बहिरोबा, बोखारे पांगरा, सेनगाव तालुक्यामधील सुलदली या गावामध्ये मानव विकास अंतर्गतच्या फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळेव्दारे माती परीक्षण करण्यात आले.
गावामधील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे सरासरी प्रमाण ०.२१ ते ०.४० असे आढळून आले. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे ०.५० ते १ टक्का असणे अत्यंत गरजेचे आहे. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो.
शेतकऱ्यांकडून माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक, सेंद्रिय, जैविक खतांचा संतुलित वापर व्हायला हवा. प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करून, जमिनीची आरोग्य पत्रिका समजून घ्यावी.
जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीची शिफारस तज्ज्ञांकडून व्हायला हवी आणि पिकांच्या गरजेनुसारच संतुलित खतांचा वापर होईल याची काळजी सर्वांनी घ्यायला घेणे गरजेचे आहे, असे डॉ. शेळके म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.