Solapur Zilha Bank : सोलापूर जिल्हा बँकेला कुशल मनुष्यबळाचा तुटवडा

Solapur District Central Cooperative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकाला आता अलीकडेच पुन्हा अकरा महिन्यांची मुदत वाढ मिळाली.
Solapur Zilha Bank
Solapur Zilha Bank Agrowon

Solapur Bank News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकाला आता अलीकडेच पुन्हा अकरा महिन्यांची मुदत वाढ मिळाली.

या निर्णयाने जिल्हा बँकेच्या कामकाजाला काही प्रमाणात दिशा मिळणार असली, तरी बँकेला मात्र सध्या कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. बँकेसमोर सध्या थकित असलेले शेती आणि बिगर शेती कर्जवसुलीचे आव्हान आहे.

सोलापूर जिल्हा बँकेच्या सुमारे दोनशेहून अधिक शाखा आहेत. परंतु शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना तत्काळ सेवा देण्यासाठी बँकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्याचा परिणाम बँकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे.

बँकेच्या सर्व शाखांसाठी १ हजार ४३७ आकृतीबंध मंजूर झालेला आहे. पण संचालक मंडळ नसल्याने नव्याने नोकरी भरती करता येत नाही.

Solapur Zilha Bank
Solapur District Bank : ‘डीसीसी’च्या ‘ओटीसीएस’ला जूनपर्यंत मुदतवाढ

जिल्हा बँकेत सध्या ९५६ इतके कर्मचारी कार्यरत आहेत. पण दरमहा बँकेतून जवळपास २० ते २५ कर्मचारी सरासरी निवृत्त होत आहेत.

यापूर्वी जिल्हा बँकेत संचालक मंडळ कार्यरत असताना, नोकरी भरतीची परवानगी ‘नाबार्ड’ व ‘आरबीआय’ यांच्याकडे मागितली होती. पण ही परवानगी येण्यापूर्वीच बँक बरखास्त झाली आणि त्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आला.

अन्यथा वसुलीवर परिणाम

गेल्या चार-साडेवर्षापासून बँकेवर प्रशासक नियुक्त आहे. बऱ्यापैकी बँकेची कर्जवसुली आणि अन्य कामकाजातून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या बँकेला प्रशासकांनी बाहेर काढले आहे. सध्या बँक रुळावर आल्याची परिस्थिती आहे.

पण आता पुन्हा मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळे वसुलीच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे, असे शेतकरी संघटना आणि कर्मचारी संघाचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com