'GI' Rating Pomegranate : डाळिंबाच्या ‘जीआय’ मानांकन ‘युजर्स’मध्ये सोलापूरची आघाडी

सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. त्यानंतर आता या मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता (यूजर्स) म्हणून जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
pomegranate Market
pomegranate Market Agrowon

सुदर्शन सुतार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. त्यानंतर आता या मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता (यूजर्स) म्हणून जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

जीआय मानांकन मिळालेल्या अन्य फळांच्या तुलनेत सोलापुरातील डाळिंब उत्पादकांनी या मानांकनाचे ‘युजर्स’ म्हणून आघाडी घेतली असून, देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेमध्ये सोलापूरच्या डाळिंबाला त्यामुळे स्वतःची अशी ओळख मिळणार आहे.

भौगोलिक मानांकन ही केंद्र सरकारतर्फे उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे. त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे, हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे, जे त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते.

स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उत्पादनाची वेगळी ओळख होते. शेतमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष गुणधर्म असलेल्या पिकांना भौगोलिक मानांकनाचा दर्जा दिला जात असतो.

या मानांकनामुळे पिकाचे वेगळेपण समोर येते. बाजारपेठेत भौगोलिक मानांकन मिळालेल्या पिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते.

pomegranate Market
GI Rating : ‘जीआय’ मानांकनासंबंधी डाळिंब उत्पादकांना प्रशिक्षण

डाळिंबासाठी सोलापूर जिल्ह्याला मानांकन मिळाले आहे. पण शेतकऱ्यांकडे जीआय मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्र आवश्यक आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ आणि कृषी विभागाने या प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.

यापूर्वी या प्रमाणपत्राचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे राहिला आणि त्याचा परिणाम आता १७६६ शेतकऱ्यांची नोंदणी होण्यात झाली आहे.

१७६६ शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे, ११०० प्रलंबित

सोलापूर जिल्ह्यात एकूण १७६६ शेतकऱ्यांनी जीआय प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्यात सांगोल्यातील सर्वाधिक ७०१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर मंगळवेढ्यातील ४७०, पंढरपुरातील ३१६, माळशिरसमधील १७८, मोहोळमधील ३९, बार्शीतील ३१, दक्षिण सोलापुरातील १७, माढ्यातील १२, करमाळ्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय आणखी ११०० शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com