Soybean Seed
Soybean Seed Agrowon

Soybean Seed : उगवणक्षमता तपासून घरातील सोयाबीन बियाणे पेरा

Soybean Cultivation : आगामी खरीप हंगामात शेतकरी स्वतः उत्पादित केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासून लागवड करावी, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला.

Akola Soybean News : आगामी खरीप हंगामात शेतकरी स्वतः उत्पादित केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासून लागवड करावी, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला.

येत्या खरीप हंगामासाठी हंगामपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. त्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने ‘आत्मा’ प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) मिलिंद जंजाळ, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शनात बाळापूर तालुक्यातील सांगवी (जोमदेव) येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कृषी विभागाच्या आत्माचे तालुका तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार, कृषी सहायक गोपाल राऊत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Soybean Seed
Soybean Market : दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला

मागील वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे यंदा बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरावे. आपल्याकडे घरीच किंवा गावातील उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण चाचणी घेऊन त्यानुसारच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून खरीप पेरणीचे नियोजन करावे. सोयाबीन सरळ वाण व स्वपरागीत पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही. मात्र पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी घरच्या घरी ही चाचणी घ्यावी. सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक नमूना काढून गोणपाट घ्यावे. १०० दाणे घेत त्यापैकी उगवलेल्या बियाण्यांची टक्केवारी ७० पेक्षा जास्त असेल तर असे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन श्री. शेगोकार यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकही करून दाखवले.

गोपाल राऊत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात जमीन आरोग्य पत्रिका, पीकविमा, अपघात विमा, बियाणे प्रक्रिया, एकात्मिक कीड-रोगनियंत्रण यांसह इतर योजनांची माहिती दिली. या वेळी सरपंच सुजाता गवई, सिद्धार्थ गवई, ज्ञानेश्‍वर सांगोकार, प्रशांत लांडे, रविंद्र सोनटक्के, उद्धव लांडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com